टोमॅटोची लाली उतरली, तीन रुपये किलोने विक्री

टोमॅटोची लाली उतरली, तीन रुपये किलोने विक्री


नाशिक | Nashik
टोमॅटोची आवक जिल्ह्याच्या (Nashik District) विविध भागात मोठया प्रमाणात होत असल्याने प्रति किलोला अवघा 3 ते 5 रुपये दर मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक (Tomato growers) शेतकरी हवालदिल झाला आहे.

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विदेशात टोमॅटोची निर्यात (Export of tomatoes) कशी वाढवता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लासलगांव कृषी उत्पन्न बाजार (Lasalgoan Krushi Bajar Samiti) समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी केंद्र सरकारकडे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार (Union Minister Dr. Bharti Pawar) यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु केला आहे.

कांद्याची नगरी असलेल्या लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो दराची लाली उतरली आहे.बाजार समितीत सोमवारी(दि.२३) 30 हजार क्रेट्स आवक झाली. 3 ते 5 रुपये इतका किलोला दर मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.


नाशिक, नगर, पुणे, औरंगाबादसह राज्यातील इतर जिल्ह्यात तसेच राजस्थान, बंगलुरू आणि गुजरात या ठिकाणी प्रामुख्याने स्थानिक टोमॅटोची मोठी आवक होत आहे. यामुळे टोमॅटो उत्पादनाच्या तुलनेत देशांतर्गत मागणी कमी असल्याने आणि गेल्या तीन वर्षांपासून पाकिस्तान बॉर्डर बंद असल्याने त्याचा थेट परिणाम टोमॅटोच्या दरावर झाला आहे.

लासलगावसह पिंपळगाव बसवंत, वणी, चांदवड आणि येवला बाजार समितीत टोमॅटोच्या 20 किलोच्या क्रेट्सला 60 ते 100 रुपयांपर्यंत म्हणजे तीन ते पाच रुपये किलो इतका बाजार भाव मिळत आहे. कमी दरामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. वाहतूक, मार्केटमधील चढ-उतार, तोडणीचा खर्चही निघत नाही, अशी परिस्थिती आहे.


केंद्र शासनाकडे पाठपुरावा
टोमॅटोची निर्यात इतर राज्यांसह विदेशात कशी वाढवता येईल. यासाठी टोमॅटो निर्यातदार व्यापाऱ्यांनी लासलगांव बाजार समितीकडे मागणी केली आहे. लासलगांव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी आर्थिक संकटात सापडलेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या माध्यमातून टोमॅटोची निर्यात वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com