प्रतवारी करून माल विक्रीस आणा : आ.बनकर

प्रतवारी करून माल विक्रीस आणा : आ.बनकर

पालखेड मिरचीचे । वार्ताहर Palkhed Mirchiche

पिंपळगाव बाजार समितीत Pimpalgaon APMC कामकाज करतांना शेतकरी वर्गाला केंद्रस्थानी मानत कामकाज सुरू असून बाजार समितीच्या माध्यमातून सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे. विक्री केलेल्या मालाची योग्य किंमत व त्याची रोख रक्कम तत्काळ उपलब्ध करून देण्याची व्यवस्था बाजार समिती व व्यापारी वर्गाने केली आहे.

चांगल्या मालाला निश्चितच चांगला दर मिळत आहे. परिसरातीलच नव्हे तर निफाड व चांदवड तालुक्यातील शेतकरी येथे शेतमाल विक्रीसाठी आणतात. शेतकर्‍यांनी प्रतवारी करून माल विक्रीसाठी आणल्यास योग्य मोबदला देणे सुलभ होईल असे प्रतिपादन बाजार समिती सभापति आमदार दिलीप बनकर यांनी केले आहे.

पालखेड येथे भुसार शेतमाल लिलाव शुभारंभाप्रसंगी बनकर बोलत होते. याप्रसंगी बाजार समिती संचालक केशव बोरस्ते, नारायण पोटे, शरद काळे उपस्थित होते. आमदार बनकर म्हणाले की, पालखेड उपबाजार आवारात भुसार माल व द्राक्ष मण्याचे लिलाव सुरू करुन शेतकर्‍यांचा वेळ व पैशांची बचत झाली आहे. व्यापारी वर्गाला देखील चांगल्या दर्जाचा माल उपबाजार आवारात उपलब्ध होत असल्याने बाजारभाव अधिक असतात. आमदार बनकर यांच्या हस्ते भुसार मालाच्या लिलावाचा प्रारंभ करण्यात आला.

शुभारंभाप्रसंगी भाडंगाव येथील अंबादास पोटे यांच्या सोयाबीनला 5111 रूपये बाजारभाव मिळाला. कमीत कमी 4021 ते जास्तीत जास्त 6001 रु. प्रतिक्विंटल दर मिळाला. या दिवशी 120 क्किंटल सोयाबीन तर गव्हाची 5 क्किंटल आवक होऊन बाजारभाव कमीत कमी 1652 रु. ते जास्तीत जास्त 1800 रूपये बाजारभाव मिळाला.

याप्रसंगी माधव ढोमसे, रमेश शिंदे, कांता बनकर, अशोक आहेर, बाबासाहेब शिंदे, भाऊसाहेब मेधने, दशरथ जगझाप, मनोहर थेटे, श्रीधर जाधव, बाबाजी आहेर, सरपंच रवींद्र कोकाटे, व्यापारी मंगेश छाजेड, प्रकंज बोथरा, गणेश कुलकर्णी, रोशन घुले, आतिश कोचर, रोशन बाफणा, तेजस बंब, साखरचंद गंगावाल, कुणाल भटेवरा, परसराम शर्मा, बाजार समिती सचिव बाजारे, पालखेड कार्यालयाचे निरीक्षक सदाशिव थेटे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.