गिरणारे येथे स्वंयनिर्मित ऑक्सिजन युनिट

गुरुवारपासून होणार कार्यान्वित
गिरणारे येथे स्वंयनिर्मित ऑक्सिजन युनिट

देवळाली कॅम्प | Deolali Camp आॉक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून ऑक्सिजन ची नितांत गरज निर्माण झाली आहे.

त्यासाठी बांधकाम व्यवसायिकांच्या मदतीने गिरणारे येथील ग्रामिण रूग्णालयात स्वंय निर्मिती आक्सिजन युनिट बसविण्यात येऊन ते गुरुवार पर्यन्त कार्यन्वित होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

सदर मशिन आज बडोदा येथून निघणार असून गुरूवारपर्यत मशिन प्रत्यक्ष कार्यान्वित होणार आहे. या स्वंयम निर्मिती ऑक्सिजन युनिटमुळे खासदार गोडसे यांच्या प्रयत्नाना यश आले आहे.

प्रेसच्या सामाजिक दायित्व निधीतून जिल्हयातील तिन रूग्णालयांमध्ये स्वंय निर्मित आक्सिजन युनिट मंजूर केल्यानंतर आता बांधकाम व्यवसायिकांच्या मदतीने गिरणारे येथील ग्रामिण रूग्णालयात स्वंय निर्मिती आक्सिजन युनिट बसविण्यात येणार आहे. सदर मशिन आज बडोदा येथून निघणार असून गुरूवारपर्यत मशिन प्रत्यक्ष कार्यान्वित होणार आहे.

या स्वंयम निर्मिती ऑक्सिजन युनिटमुळे गिरणारे आणि पंचक्रोशीतील रूग्णांना ऑाक्सिजन तुटवड्यापासून निश्चितच दिलासा मिळणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

करोनाने जिल्ह्यामध्ये थैमान घातला असतांना ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाले आहे. विविध हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना ऑक्‍सिजन कमी पडू नये, यासाठी खा.गोडसे यांच्या प्रयत्नातून आठवडयाभरापूर्वी इंडिया सेक्युरिटी प्रेसच्या सीएसआर फंडातून देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल, सिन्नर व इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन युनिट बसविण्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

नाशिक तालुक्यातील गिरणारेसह पंचक्रोशीतील बाधित रुग्णांची ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी होत असून या ठिकाणी ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. याची दखल घेऊन खा. गोडसे यांनी बांधकाम व्यावसायिकांच्या संस्थेशी संपर्क साधत ऑक्सीजन युनिटसाठी मदतीचे आवाहन केले होते.

त्यानुसार या व्यवसायिकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे. खा गोडसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी काल बडोदा येथे जाऊन स्वयंनिर्मित ऑक्सिजन युनिटच्या प्लांटची पाहणी करत कंपनीचे कार्यकारी अधिकारी जगदीश शर्मा यांच्याशी युनिटच्या कार्यक्षमतेविषयी सविस्तर चर्चा केली.

तसेच सदर मशीन तातडीने नाशिक कडे रवाना करून गुरुवार पर्यन्त कार्यन्वित करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी उद्योजक भाऊसाहेब सांगळे, नगरसेवक आर.डी धोंगडे आदी उपस्थित होते

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com