शासन आपल्या दारी अभियानांतर्गत स्वयंरोजगार कर्ज वितरण महामेळावा

शासन आपल्या दारी अभियानांतर्गत स्वयंरोजगार कर्ज वितरण महामेळावा
USER

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) कार्यक्षेत्रात प्रधानमंत्री आत्मनिर्भर पथविक्रेता निधी योजना (पीएम स्वनिधी) योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

अभियानांतर्गत पथविक्रेत्यांना (Street vendors) खेळते भांडवल मिळावे या दृष्टीकोनातून सुरु करण्यात आले असून सदरची योजना राज्यात राबविली जात आहे. या योजनेचा महत्वाचा भाग म्हणजे पथविक्रेत्यांचे औपचारिक अर्थव्यवस्थेत समावेशन करणे. लाभार्थी पथविक्रेत्यांनी आर्थिक व्यवहार करतांना, डिजिटल (digital) साधनांचा वापर केल्यावर लाभार्थी पथविक्रेत्यांना कर्जाच्या रकम्मे व्यतिरिक्त कॅश बॅक (Cash back) प्राप्त होणार आहे.

10 हजाराचे कर्ज मिळालेल्या लाभार्थीना केंद्र शासनाकडून (central government) परिचय बोर्ड देण्यात येते आहे. तसेच बँकामार्फत पथविक्रेत्यांना 50 हजार, 20 हजार व 10 हजाराचे कर्ज वितरण (Debt Disbursement) करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांच्या पुढाकाराने स्वयंरोजगार कर्ज वितरण महामेळावा मंगळवारी (दि.28) सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत महाकवी कालीदास कलामंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रमात केंद्र शासन पुरस्कृत पीएम स्वनिधी (PM Self Fund) आणि डे-एनयुएलएम (Day-NULM) योजनेतर्गत पथविक्रेते, बचतगट व वैयक्तिक स्वयंरोजगार लाभार्थींना बँकामार्फत कर्ज मंजूरी व वितरण करण्यात येणार आहे. पीएम स्वनिधी योजनेतर्गत केंद्र शासनाकडून प्राप्त परिचय बोर्ड सदर कार्यक्रमात पथविक्रेत्यांना वाटप करण्यात येणार असून कर्ज मिळालेल्या सर्व पथविक्रेत्यांना ऑनलाईन आर्थिक व्यवहार करणेसाठी क्यू-आर कोड (QR Code) वाटप करणे ते कसे वापरावे त्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

तसेच पथविक्रेते, बचतगटातील लाभार्थी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी केंद्र शासन, राज्य शासन, महामंडळाकडील योजनांची माहिती देण्यात येणार असून, त्यांचा लाभ मिळणेसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शासनाच्या उपक्रमासाठी जास्तीत जास्त पथविक्रेत्यांनी, बचतगटातील महिलांनी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन एनयुएलएम विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळेयांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com