येत्या महासभेत विषय समिती सदस्यांची निवड

शहर सुधार, विधी, महिला बाल कल्याण व आरोग्य सदस्य निवड
येत्या महासभेत विषय समिती सदस्यांची निवड

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेच्या मुदत संपलेल्या सहा प्रभाग समिती सभापती पदाची निवडणुक जाहीर झाल्यानंतर आता विषय समिती सदस्य निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहे.

येत्या महासभेत शहर सुधार, विधी, महिला बाल कल्याण व वैद्यकिय व आरोग्य समिती अशा विषय समिती सदस्यांची निवड केली जाणार आहे. मुदत संपलेल्या या विषय समित्याचे काम सुरू होण्याच्या दृष्टीने सत्ताधारी भाजपाकडुन ही प्रक्रिया सुरु झाली आहे.

महापालिकेच्या सहा प्रभाग समितीची मुदत गेल्या जुन महिन्यात संपलेली असतांना करोनामुळे प्रभाग सभापती पदाची निवडणुक लांबली होती. आता येत्या 15 आक्टोंबर रोजी प्रभाग सभापती पदाची निवडणुक एकाच दिवसात आटोपली जाणार आहे.

याकरिता विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या निवडणुकीच्या प्रक्रियेची तयारी केली आहे. त्यानंतर आता गेल्या जुलै महिन्यात मुदत संपलेल्या विषय समिती सदस्याच्या निवड करण्यासंदर्भात सत्ताधारी भाजपाकडुन हालचाली सुरु झाल्या आहे.

काही महिन्यावर महापालिकेची सार्वत्रिक निवडणुक येऊन ठेपली असुन करोनामुळे नगरसेवकांना आपली विकास कामे करता आलेली नाही. यामुळे आता विषय समिती सदस्य निवडण्याचे काम येत्या महासभेत करण्याच्या दृष्टीने आता हालचाली सुरु झाल्या आहे.

यात शहर सुधार, विधी, महिला बाल कल्याण व वैद्यकिय व आरोग्य समिती सदस्य निवडची प्रक्रिया येत्या महासभेत पुर्ण करण्याच्या दृष्टीने काम सुरू झाले आहे. यासंदर्भात लवकर सर्वच गटनेत्यांना कळविण्यात येणार आहे.

येत्या महासभेत विषय समिती सदस्यांची निवड झाल्यानंतर तात्काळ विभागीय आयुक्तांकडे पत्र पाठवून विषय समिती सभापती पदाची निवडणुक घेण्यासंदर्भात तयारी केली जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com