
लासलगाव । वार्ताहर | Lasalgaon
येथील लोकनेते दत्ताजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे पाच माजी विद्यार्थी (students) प्रतीक गारे (आर्मी टेक्निकल, सिकंदराबाद), तेजस वेताळ (महार रेजिमेंट, सागर), शुभम वाळके (मराठा लाईट इन्फंट्री, बेळगाव), नितीन नेटारे (महार रेजिमेंट, सागर) तसेच राहूल वाळके (सीआयएसएफ आराकोन्नम, चेन्नई) यांची भारतीय सैन्यदलात (Indian Army) निवड झाली आहे.
सदर यशाबद्दल विद्यालयाच्या एनसीसी (NCC) विभाग आणि लासलगाव (lasalgaon) स्विमिंग ग्रुप (Swimming group) यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. लासलगाव पोलीस स्टेशनचे (Lasalgaon Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल वाघ (Assistant Police Inspector Rahul Wagh) यांनी अध्यक्षीय मनोगतात आपल्या बालपणातील आठवणी विद्यार्थ्यांना (students) सांगून मी कसा घडलो या विषयी विद्यार्थ्यांना (students) उद्बोधन केले. सदर विद्यार्थ्यांचा संस्थेचे उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, ज्येष्ठ संचालक सिताराम जगताप, लक्ष्मण मापारी, कैलास ठोंबरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्राचार्य दत्तू गांगुर्डे, पर्यवेक्षक केशव तासकर, लासलगाव स्विमिंग ग्रुपचे राजू राणा, डॉ.अनिल बोराडे, अनिल गवळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी ऑफिसर प्रमोद पवार यांनी तर अरुण खांगळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.