महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर नाशिकच्या सहा जणांची निवड

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर नाशिकच्या सहा जणांची निवड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (Maharashtra Cricket Association) विविध समितींवर नाशिकच्या सहा जणांची निवड झाल्याने भविष्यात नाशिकमध्ये रणजी सामने तसेच काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले जाण्याची शक्यता वाढली आहे. निवड झालेल्यांमध्ये प्रशांत राय (Prashant Rai), समीर रकटे (Sameer Rakte), किरण जोशी (Kiran Joshi), भगवान काकड (Bhagwan Kakad), शेखर घोष (Shekhar Ghosh) आणि विनोद यादव (Vinod Yadav) यांचा समावेश आहे...

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अतिशय महत्त्वाच्या क्रिकेट ऑपरेशन कमिटी सीओसीवर नाशिकचे रणजी पटू प्रशांत राय यांची सलग दुसर्‍यांदा निवड झाली आहे.

क्रिकेट ऑपरेशन कमिटी ही महाराष्ट्र क्रिकेटचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे निर्णय घेण्याचे काम करते. प्रशांत राय यांनी यापूर्वी महाराष्ट्र रणजी संघाचे निवड समिती सदस्य तसेच २३ वर्षाखालील संघाचे निवड समिती सदस्य आणि १९ व १६ वर्षांखालील संघाचे निवड समितीचे चेअरमन म्हणून काम बघितले आहे.

नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे सेक्रेटरी समीर रकटे यांची सलग आठव्या वर्षी महाराष्ट्राच्या स्पर्धा समितीवर निवड झाली आहे. के. व्ही. जोशी यांची महाराष्ट्र रणजी संघाचे निवड समिती सदस्य पदी निवड झाली आहे. किरण जोशी यांनी यापूर्वीदेखील महाराष्ट्र संघाचे १९ वर्षांखालील निवड समितीचे सदस्य म्हणून बरीच वर्षे काम केले आहे.

नाशिकचे रणजीपटू भगवान काकड यांची सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या १९ वर्षाखालील निवड समिती सदस्य म्हणून निवड झाली. रणजीपटू शेखर घोष ह्यांची देखील १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून पुन्हा नियुक्ती झाली आहे. शेखर घोष यांना यापूर्वी देखील रणजी २३, १९ व १६ वर्षांखालील महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केल्याचा अनुभव आहे.

नाशिकच्या विनोद यादवची महाराष्ट्राच्या २५ वर्षाखालील क्रिकेट संघासाठी फिजिकल ट्रेनर पदी निवड झाली आहे. हयापूर्वी देखील विनोद यादव यांनी १६ व २३ वर्षांखालील संघाचे ट्रेनर पद भूषविले होते. विनोद यादव गेल्या तीन वर्षांपासून नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पुरुष व महिला खेळाडूंना शारीरिक तंदुरुस्तीसाठी मार्गदर्शन करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com