प्राचार्य डॉ.व्ही.बी.गायकवाड यांची निवड

प्राचार्य डॉ.व्ही.बी.गायकवाड यांची निवड

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या MVP के.टी.एच.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य Principal of KTHM College आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य , माजी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. व्ही .बी .गायकवाड यांची पुणे येथील समारंभात महाराष्ट्र विज्ञान अकादमीची सन्माननीय फेलो Honorary Fellow of Maharashtra Academy of Sciences म्हणून निवड करण्यात आली.

मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या राष्ट्रीय संस्थेचे कुलगुरु व पद्मश्री जी.डी.यादव यांच्या हस्ते संस्थेच्या पुणे येथील समारंभात ही फेलोशिप प्रदान करण्यात आली.ज्यांनी अध्यापन शिक्षण संशोधन विकास किंवा विज्ञान अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान तसेच सामाजिक विज्ञान या शाखेच्या कोणत्याही क्षेत्रातील सामाजिक योगदानाबद्दल आणि संशोधनाबद्दल संस्थेतर्फे ही फेलो म्हणून निवड करण्यात येते.प्राचार्य गायकवाड यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबर रसायनशास्त्र विषयात केलेल्या संशोधन आणि व्यापक योगदानाबद्दल ही फेलो म्हणून निवड करण्यात आली.

त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघोनाना अहिरे, सरचिटणीस नीलिमा पवार, चिटणीस सुनील ढिकले यांनी अभिनंदन केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com