
वावी । वार्ताहर | Vavi
येथील नूतन विद्यालयाच्या खेळाडूंनी (players) जिल्हास्तरीय विविध मैदानी स्पर्धेत (district level various outdoor competition) बाजी मारल्याने त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड (Selection for state level competition) करण्यात आली आहे.
नाशिक जिल्हा अॅथलेटिक असोशिएशनतर्फे (Nashik District Athletic Association) राज्य निवड स्पर्धेचे आयेाजन (Organization of State Selection Competition) करण्यात आले होते.
यात नूतनच्या 50 खेळाडुंनी विविध खेळात भाग घेत बाजी मारली. यापैकी 8 खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. 16 वर्ष वयोगटात 100 मी. धावणे स्पर्धेत साक्षी कोल्हे (द्वितीय), रसिका देव्हाड (तृतीय), उंच उडी स्पर्धेत कृष्णा काटे (प्रथम), गोळा फेक स्पर्धेत राहुल जाधव (प्रथम), 18 वर्षे वयोगटात 100 मी. धावणे स्पर्धेत रुतुजा घोटेकर (द्वितीय), 100 मी हर्डल्स स्पर्धेत रुतुजा घोटेकर (प्रथम), 200 मी. धावणे स्पर्धेत दिया कुटे (तृतीय),
400 मी. धावणे स्पर्धेत वैष्णवी खरात (प्रथम), दिव्या घोटेकर (द्वितीय), 800 मी. धावणे स्पर्धेत दिया कुटे (तृतीय), गोळा फेक स्पर्धेत सपना कथले (द्वितीय), शुभांगी वेलजाळी (तृतीय) यांनी बाजी मारली. विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक व्ही. जे. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य कापडणीस, पर्यवेक्षक भाऊसाहेब गुंजाळ, सरपंच प्रशांत कर्पे, उपसरपंच विनायक घेगडमल, कन्हैयालाल भुतडा यांच्यासह ग्रामस्थांनी कौतुक केले.