
सुरगाणा | प्रतिनिधी | Surgana
घागबारी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित घागबारी (ता. सुरगाणा) या संस्थेच्या चेअरमनपदी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख मोहन गांगुर्डे (Mohan Gangurde) यांची सहाव्यांदा बिनविरोध निवड झाली आहे...
तसेच उपचेअरमनपदी तुळशीदास पिठे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आदिवासी उपयोजना सुरगाणा यांनी काम काज पाहिले.
यावेळी संस्थेचे संचालक मनोहर गायकवाड, रामचंद्र भोये, दत्तू पिठे, कृष्णा गायकवाड, कृष्णा गुंबाडे, जयराम गायकवाड, चंद्रकला भोये, सोनीबाई गवळी, आलिमन लिलके तसेच संस्थेचे सचिव ठाकरे उपस्थित होते. निवडणूक सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आदिवासी उपयोजना कार्यालय सुरगाणा येथे पार पडली.