मायको हॉस्पिटलची निवड

राज्यातील 10 केंद्रांत समावेश
मायको हॉस्पिटलची निवड

सातपूर । प्रतिनिधी Satpur

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी (Maharashtra State AIDS Control Society)अंतर्गत नॅशनल ग्रेशन बोर्ड ऑफ टेस्टिंग अँड सेलिब्रेशन लॅबरोटरी असिस्टंटच्या माध्यमातून करण्यात आलेल्या तपासणी अंतर्गत नाशिक महापालिकेच्या सातपूर येथील मायको हॉस्पिटलची( MICO Hospital Satpur ) ‘इंटिग्रेटेड कौन्सिलिंग अँड टेस्टिंग सेंटर’ म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 32 केंद्रांमधून ही निवड करण्यात आली.

नाशिक महापालिकेच्या सातपूर, बिटको व इंदिरा गांधी येथील रुग्णालयात तर सिव्हिल व जिल्हा परिषदेचे 28 आणि वसंतराव मेडिकल कॉलेज आयसीटीसी केंद्र कार्यान्वित आहे. एनएबीएल नॅशनल एक्रिडेशन बोर्ड ऑफ टेस्टिंग अँड सेलिब्रेशन लॅबरोटरी असिस्टंटच्या माध्यमातून दि.18 ऑक्टोबर रोजी रुग्णालयाचे अंतिम तपासणी करण्यात आली. विविध प्रकारच्या नियमावलीत सातपूरचे मायको रुग्णालय परिपूर्ण असल्याने त्यांना 96 टक्के गुण मिळाले होते. संपूर्ण राज्यातून अशा प्रकारची दहा केंद्रांची निवड करण्यात आली असून, या निवडीच्या निकषात नाशिक जिल्ह्यातील एकमेव मायको रुग्णालयातील केंद्र ठरलेले आहे. लवकरच या केंद्रांना केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याकडून प्रमाणपत्र बहाल केले जाणार आहे.

मायको हॉस्पिटलच्या या केंद्रात एचआयव्ही रक्त चाचणी केली जाते. या केंद्रामध्ये दोन प्रयोगशाळा आहेत. त्यापैकी एक प्रयोगशाळा एचआयव्ही रक्त चाचणीसाठी आहे. या केंद्राचे अद्ययावत कामकाज उत्कृष्ट व्यवस्थापन एचआयव्हीग्रस्तांचे समुपदेशन याची दखल घेत या केंद्राची निवड केली आहे. एड्स नियंत्रणासाठी आयसीटीसी केंद्रामार्फत एकात्मिक समुपदेशन केले जाते. मायको रुग्णालयातील समुपदेशन अश्विनी भोसले आणि प्रयोगशाळा तंत्रज्ज्ञ हेमांगी जोशी यांनी मायक्रो रुग्णालयातील आयसीटीसी केंद्राच्या केलेल्या नियोजन मांडणी आणि रेकॉर्ड तसेच एकात्मिक सल्ला केंद्रात केलेल्या नियोजनामुळे एनएबीएल असिस्टंटसाठी या केंद्राची निवड झाली आहे.

सातपूर मायको रुग्णालयाचा रोज शेकडो रुग्णालयाची रक्त चाचणी केली जाते. यात किमान दोन ते तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळतात. पॉझिटिव्ह रुग्णांना एकात्मिक समुपदेशन केंद्रात विशेष सल्ला दिला जातो. रुग्णांची माहिती जिल्हा रुग्णालयाकडे पाठवली जाते. केंद्राच्या आरोग्य विभागाकडून मानांकित एचआयव्हीग्रस्तांची रक्तांची चाचणी करणारे पालिकेचे केंद्र आयसीटीसी केंद्र जिल्ह्यात प्रथम सर्वोत्कृष्ट व्यवस्थापनाचे सन्मानया केंद्राने पटकावला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com