भरडधान्य योजना प्रकल्पासाठी बोकटे गावाची निवड

भरडधान्य योजना प्रकल्पासाठी बोकटे गावाची निवड

येवला | प्रतिनिधी

तालुक्यातील बोकटे येथे यंदाच्या खरीप हंगामात कृषी विभागामार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान भरडधान्य योजने अंतर्गत मका पीक प्रकल्पासाठी तालुक्यातील बोकटे गावाची निवड कृषी विभागा अतर्गत करण्यात आली आहे.

या प्रकल्पात १० हेक्टर क्षेत्र असून, एक एकर क्षेत्रासाठी एकूण २५ शेतकरी निवडायची तरतूद आहे. त्यामुळे बोकटे येथील कृषी विभागा मार्फत प्रचार प्रसिद्धी करून, प्राप्त यादीनुसार इच्छुक शेतकर्‍यांची नावे नोंदवण्यात आली आहे. तसेच शेतकरी संख्या जास्त असल्यामुळे चिठ्ठी टाकून एकूण २५ शेतकर्‍यांची निवड बोकटे येथील लहान मुलाच्या हस्ते चिठ्‌ठ्या काढून करण्यात आली. व निवड झालेल्या शेतकर्‍यांना जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले व मंडळ कृषी अधिकारी अंदरसुल यांच्या हस्ते बांधावर बियाणे वाटप कार्यक्रम करण्यात आला आहे.

कृषी पर्यवेक्षक पाटोळे, कृषी सहाय्यक गिरी यांनी शेतकर्‍यांना या योजनेची सविस्तर माहिती दिली.या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना कृषी विभाग व विद्यापीठाच्या शिफारशीनुसार मका पिकाची लागवड करून शेतीचे कामे करावे आणि मका पिकाला पेरणीपूर्वी ६ मिली ऍझोटोबॅक्टर व ६ मिली पी. एस. बी प्रति किलो बियाण्यास लावून बीज प्रक्रिया करावी व नंतर अर्धा तास बियाणे सावलीत सुकवून पेरणी करावी असे त्यांनी या वेळी सांगितले.

या वेळी जिल्हापरिषद सदस्य महेंद्र काले बोकटे येथील सरपंच प्रताप दाभाडे, रामनाथ दाभाडे, बापूसाहेब दाभाडे, हितेश दाभाडे, के. वाय. सिद्दीकी, बी.आर.पाटोळे, कृषी सहाय्यक जी. ए. गिरी यांच्या सह आदी शेतकरी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com