लासलगाव बाजार समितीच्या सभापतीपदी क्षीरसागर तर उपसभापतीपदी डोमाडे

छगन भुजबळ यांची शिष्टाई; दोनही गट एकत्र
लासलगाव बाजार समितीच्या सभापतीपदी   क्षीरसागर तर उपसभापतीपदी डोमाडे

लासलगाव | प्रतिनिधी | Lasalgaon

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडून आलेल्या दोन्ही गटांना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एकत्र करत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच भुजबळ समर्थक बाळासाहेब क्षीरसागर (Balasaheb Kshirsagar) यांना सभापती पदाची संधी दिली. तर दुसऱ्या गटाचे तरुण उमेदवार गणेश डोमाडे (Ganesh Domade) यांना उपसभापती पदाची संधी दिली. यावेळी समर्थक आणि कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला...

यावेळी जयदत्त होळकर, पंढरीनाथ थोरे, ज्ञानेश्वर जगताप, दिलीप खैरे, राजेंद्र डोखळे, सुवर्णाताई जगताप, प्रकाश दायमा, डॉ. श्रीकांत आवारे, सोनिया होळकर, तानाजी आंधळे, ललित दरेकर, प्रवीण कदम, भीमराज काळे, छबुराव जाधव, राजेंद्र बोरगुडे, महेश पठाडे, बाळासाहेब दराडे, रमेश पालवे, ज्ञानेश्वर शेवाळे, पांडुरंग राऊत, मंगेश गवळी, समाधान जेजुरकर, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, नितीन गायकवाड, यांच्यासह सर्व संचालक मंडळ व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

लासलगाव बाजार समितीच्या सभापतीपदी   क्षीरसागर तर उपसभापतीपदी डोमाडे
नव्या संसद भवनावरून राजकीय हंगामा! उद्घाटनावर ‘हे’ पक्ष घालणार बहिष्कार

आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही अतिशय चुरशीची झाली. या निवडणुकीत उभ्या असलेल्या दोनही गटांना समसमान ९ जागा मिळाल्या. त्यामुळे या बाजार समितीत सत्ता स्थापनेसाठी मोठी चुरस निर्माण झाली होती.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शिष्टाई करत दोनही गटातील उमेदवारांना एकत्र बोलवून त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर दोनही गट एकत्र करून सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये माजी आमदार वसंत गीते, हेमंत धात्रक व प्रकाश दायमा यांनी महत्वाची भूमिका बजावली.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांना सभापतीपदी संधी देण्यात आली. तर समोरच्या गटातील तरुण उमेदवार गणेश डोमाडे यांना उपसभापती पदाची संधी देण्यात आली. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कारभार होण्यासाठी छगन भुजबळ यांनी दोनही गटांना एकत्र करत विकासाच्या मुद्यावर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

लासलगाव बाजार समितीच्या सभापतीपदी   क्षीरसागर तर उपसभापतीपदी डोमाडे
मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा अटकेत, मध्यरात्री कारवाई

दिलीप खैरे यांनी बजावली महत्वाची भूमिका

लासलगाव व येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सुयोग्य नियोजन करण्याची सर्वस्वी जबाबदारी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिलीप खैरे यांना दिली होती. त्यांनी या दोनही बाजार समितीच्या निवडणुकीतचोख नियोजन करून दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पडली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com