
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
प्रदूषण (Pollution) रोखण्यासाठी नमामि गोदा प्रकल्पांतर्गत (Namami Goda project) उपाययोजना केल्या जात आहेत. त्या अंतर्गत 15 जणांच्या सल्लागार समितीची निवड (Advisory Committee) करण्यात आली आहे.
त्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण (Survey) करण्यात येत असून त्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाईल. त्यामध्ये पाणी आडवणे, पाणी वळवणे, नदीकडे ला घाट बांधणे, प्रदूषण रोखणे आधी या विषयांवर सविस्तर अभ्यास केला जाणार आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल जलशक्ती मंत्रालय, दिल्ली यांना पाठवला जाणार असून त्यांच्याकडून या सूचनांवर काम केले जाणार आहे.
आयआयटीची टीम दाखल
मुंबईच्या (mumbai) मिठी नदीच्या (Mithi River) धर्तीवर नाशिकमध्येही (nashik) गोदावरी (godavari), नासरडी व वालदेवी या नद्यांच्या स्वच्छतेसाठी उपाययोजना केली जाणार आहे त्यासाठी मुंबईच्या आयआयटी (IIT) संस्थेला पाचारण करण्यात आली आहे काल या संस्थेचे दोन प्रतिनिधी शहरात दाखल झाली असून
त्यांच्या माध्यमातून गोदावरी सह या तीन नद्यांना मिळणार्या 67 नाल्यांपैकी 12 ते 15 नाल्यांचा सविस्तर अभ्यास करून प्रदूषण (Pollution) रोखण्याच्या दृष्टीने चाचपणी करण्यात येणार आहे. त्यानंतर आयआयटीची तांत्रिक टीम त्या स्थळांचा सखोल अभ्यास करण्यासाठी प्रत्यक्ष नाल्यांवर भेट देणार आहेत. सुमारे एक ते दीड महिना अभ्यास केल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल शासनाला पाठवला जाणार आहे