शिक्षक भरती प्रक्रियेत १९६ उमदेवारांची निवड

शिक्षक भरती प्रक्रियेत १९६ उमदेवारांची निवड

नाशिक । प्रतिनिधी

शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र संकेतस्थळाद्वारे नववी ते बारावीच्या वर्गांसाठी 196 शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या शिक्षकांची यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.

यापूर्वी निवडीसाठी प्रसिद्ध केलेल्या पात्र उमेदवारांच्या यादीवेळी संबंधित प्रवर्गाचे आरक्षण आणि उपलब्ध विषय यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी परीक्षेत (टेट) गुण असूनही काही उमेदवारांच्या माहितीमधील तांत्रिक अडचणीमुळे त्यांची नियुक्तीसाठी निवड झाली नव्हती.

अशा उमेदवारांसाठी ही फेरी घेण्यात आली. करोनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उमेदवारांनी नियुक्ती प्राधिकार्‍याकडे पुढील कार्यवाहीसाठी संपर्क साधावा. मुलाखतीसह पदभरतीबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे देण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com