गोल्फसाठी 14 खेळाडूंची निवड

गोल्फसाठी 14 खेळाडूंची निवड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नुकत्याच टोकियो (Tokyo) येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये (Olympics) गोल्फमध्ये (Golf) 4 था क्रमांक मिळवणारी भारताची खेळाडू अदिती अशोक (Aditi Ashok) हिच्या कामगिरीच्या गौरवार्थ रिव्हर साइड गोल्फ कोर्स, गोल्फ असोसिएशन नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रिव्हर साईड गोल्फ कोर्स (Riverside golf course), निफाड (Niphad) येथे आयोजित गुणवत्ता शोधमोहिमेच्या तीन दिवसीय मोहिमेतून चौदा खेळाडूंची निवड करण्यात आली आहे...

निवड झालेल्या खेळाडूंमध्ये करण अरुण आव्हाड, के. के. वाघ विद्याभवन भाऊसाहेबनंगर, विभोर अपूर्व भांडगे, एस्पालियर हेरिटेज स्कूल नाशिक, अकसा इरफान पठाण, केंद्रीय विद्यालय ओझर, धुव प्रवीण खोलगडे, डॉन बोस्को स्कूल नाशिक. तनुश्री प्रवीण खोलगडे, डॉन बॉस्को स्कूल नाशिक.

अनिका योगेश धोपावकर, हेरून अर्चर्स अ‍ॅकेडमी चेंबूर, प्रतीक्षा अरुण आव्हाड, गिताई कन्या विद्यालय भाऊसाहेबनगर. फरिदोज इरफान पठाण केंद्रीय विद्यालय ओझर. प्रतीक्षा विष्णू कुयटे, भीमाशंकर हायस्कूल पिंपळगाव बसवंत,

रोहित भगवान कुयटे, भीमाशंकर हायस्कूल पिंपळगाव बसवंत, आर्यन सचिन देशमुख, रायन इंटरनॅशनल स्कूल नाशिक, अदिती शयेश महाजन, फ्रावशी इंटरनॅशनल अ‍ॅकेडमी नाशिक, रिध्या चित्रेश विसपुते, स्कूल नाशिक. आयुष्यमान सिद्धार्थ तांबे, इस्पॅलियर हेरिटेज स्कूल नाशिक या खेळाडूंचा समावेश आहे.

या खेळाडूंना रिव्हर साईड गोल्फ कोर्स, निफाड, नाशिक येथे पुढील वर्षभर मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये गोल्फमध्ये आवश्यक विविध कौशल्य शिकवले जाणार आहे. येथे पूर्ण वेळ असलेले प्रशिक्षक आशिष केरोशिया, विंग कमांडर प्रदीप बागमार, नितीन हिंगमिरे, खंडू कोटकर यांच्यामार्फत नियमित प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळणार आहे.

तसेच खेळाडूंना शारीरिक क्षमतेसाठी प्रदीप राठोड यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. याशिवाय शनिवार आणि रविवार रोजी नाशिकच्या बाहेरील तज्ञ आणि राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडूंना प्रशिक्षणासाठी पाचारण केले जाणार आहे.

यामध्ये राष्ट्रीय विजेता अभिषेक मित्रा आणि अशाच उच्च प्रतीचे खेळाडू आणि प्रशिक्षक यांचा समावेश असणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक (Ravindra Naik), विंग कमांडर प्रदीप बागमार (Pradeep Bagmar) आणि जिल्हा सचिव नितीन हिंगमिरे (Nitin Hingmire) यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com