चोरीच्या दुचाकी जप्त; अंबड पोलिसांची कारवाई

चोरीच्या दुचाकी जप्त; अंबड पोलिसांची कारवाई

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

नाशिक Nashik सह मालेगाव Malegaon मधून दुचाकी चोरी Two Wheeler Theft Case केल्याप्रकरणी संशयितांना अंबड पोलिसांनी अटक करत त्यांचेकडून एक लाख दहा हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी हस्तगत करण्यात अंबड पोलिसांना यश आले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्याच्या Ambad Police Station हद्दीतील पाटील नगर येथे ( दि. 9 जानेवारी ) अनिकेत कदम यांची दुचाकी चोरीला गेल्याची फिर्याद अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती.

याप्रकरणी दुचाकी चोरांचा शोध घेण्याचे आदेश व.पो.नी. भगीरथ देशमुख यांनी अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला दिले. त्यावरून सपोनि गणेश शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित योगेश शिवाजी दाभाडे (22, रा. मु.पो. बरसाने, तालुका साक्री, जिल्हा धुळे ) पवन रमेश पाटील ( 26, रा. शिवपुरी चौक, उत्तम नगर नवीन नाशिक ) यांना पोलिसांनी सापळा रचत अटक केली.

त्यांच्यावर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्यांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. सदर संशयितांकडून नाशिक शहरासह मालेगाव येथील छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरी केलेली दुचाकी पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केल्या.

ही कारवाई व.पो.नी. भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. गणेश शिंदे,अंमलदार किरण गायकवाड, अनिरुद्ध येवले, हेमंत आहेर, जनार्दन ढाकणे, नितीन सानप, मच्छिंद्र वाकचौरे, राकेश राऊत, यांनी यशस्वीरित्या राबविली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com