चोरीच्या दुचाकी हस्तगत

चोरीच्या दुचाकी हस्तगत

मध्यवर्ती गुन्हे शाखेची कारवाई

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अंबड पोलीस ठाण्याच्या Ambad Police Station हद्दीतून दोन इलेक्ट्रिक मोटारसायकल चोरणाऱ्या Electrical Motorcycles theft case संशयितास मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या Crime Branch पथकाने सापळा रचत अटक केली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे वपोनी डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक हे दुचाकी चोरांच्या मार्गावर होते. अशातच संशयित फिरोज आयुब शेख ( २२, रा. मु. पो. जाखोरी ता. जि. नाशिक ) याच्याकडे दोन चोरीच्या इलेक्ट्रिक मोटर सायकल असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

यावरून पोलिसांनी संशयित शेख यास सापळा रचत अटक केली व त्याच्या घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेल्या 80 हजार रुपये किमतीच्या दोन इलेक्ट्रिक मोटर सायकल ताब्यात घेतल्या व सदर मोटरसायकल बद्दल त्यांनी विचारणा केली असता अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून शेख याने त्याचोरी केल्याची कबुली दिली. यावरून संशयित शेख सह इलेक्ट्रिक बाइक अंबड पोलिस ठाण्यात हजर करण्यात आल्या.

ही मोहीम वपोनी डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कुंदन सोनोने, धर्मराज बांगर, सहाय्यक उपनिरीक्षक विजय शिरसाठ, हवालदार गंगाधर केदार, शेरखान पठाण, श्रीराम सपकाळ, किशोर देसले, सुहास क्षीरसागर, आनंदा काळे, दीपक पाटील, गणेश वाघ, दशरथ निंबाळकर, विजय बनकर त्यांनी संयुक्तिक रित्या केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com