अवैध मद्यसाठा जप्त

राज्य उत्पादन शुल्कची कामगिरी
अवैध मद्यसाठा जप्त

नाशिक | प्रतिनिधी Nashik / Surgana / Aabhona

सुरगाणा तालुक्यातील हतगड शिवारात अभोणा फाटा येथे सापळा रचून टँगो पंच या देशी दारूने भरलेली बोलेरो जीप राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेतली आहे.

संशयितांच्या ताब्यातून वाहनासह दारू असा सुमारे ११ लाख ४ हजार ३५२ रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी सुरगाणा तालूक्यातील दोघांना अटक करण्यात आले आहे.

अल्केश सुरेश एखंडे (२८ रा.धोडांबे, बोरगाव ता.सुरगाणा) व अनिल चंदर महाले (२० रा.गांधीनगर, सुरगाणा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. हतगड अभोणा मार्गावरून मोठ्या प्रमाणात मद्याची वाहतूक सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागीय उपायुक्त अर्जुन ओहळ, मुख्यालय उपअधिक्षक भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक देवदत्त पोटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बेकायदा मद्यवाहतूकीची माहिती मिळताच निरीक्षक देवदत्त पोटे यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक एस.एस.रावते जवान गोकुळ शिंदे,लोकेश गायकवाड,विठ्ठल हाके,भाऊसाहेब घुले,युवराज रतवेकर आदींच्या पथकाने हतगड शिवारात सापळा लावण्यात आला होता.

अभोणा फाटा येथे पथकाने बोलेरो अडवून तपासणी केली असता त्यात टँगो या देशी दारूची १६२ खोकी आढळून आली. पथकाने दोघांना बेड्या ठोकत वाहनासह दारू असा सुारे ११ लाख ४ हजार ३५२ रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयीतांच्या अटकेने दारू तस्करांची मोठी टोळी उघडकीस येण्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com