लाखो रुपायांचा गुटखा साठा जप्त

लाखो रुपायांचा गुटखा साठा जप्त

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

गुजरात राज्यातून Gujrat State बागलाणातील नामपूरमध्ये Baglan- Nampur अवैधरित्या विक्रीसाठी आयशर टेम्पोमध्ये आणला जात असलेला 20 लाख रूपये किंमतीचा गुटखा पानमसाला Gutkha- Panmasala पुड्यांचा साठा अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या विशेष पोलीस पथकाने जायखेडा, ता. बागलाण येथे जप्त केला आहे. या कारवाईत आयशरसह गुटखा साठा असा सुमारे 27 लाख 98 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने अवैधरित्या गुटखा विक्री थांबली नसल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे.

महाराष्ट्रात गुटखा विक्रीस अथवा बाळगण्यास पुर्णत: बंदी असतांना गुजरात राज्यातून गुटखा आणण्यात येवून त्याची जिल्ह्यात सर्रासपणे विक्री सुरू आहे. पोलिसांतर्फे अनेकदा कारवाई करण्यात येवून देखील निर्ढावलेल्या विक्रेत्यांतर्फे गुटख्याची बेकायदेशीररित्या वाहतूक केली जावून विक्री केली जात आहे.

गुजरात राज्यातून ताहाराबादमार्गे नामपूरमध्ये लाखो रूपये किंमतीचा गुटखा पानमसाला आणला जाणार असल्याची माहिती अ.पो. अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांना मिळाल्याने जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाचे उपनिरीक्षक घुगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने रात्रीपासून गुजरात राज्यातून येणार्‍या मार्गावर ताहाराबाद-जायखेडा परिसरात नाकाबंदी करत वाहनांची झडती घेण्यास प्रारंभ केला होता.

पोलिसांतर्फे जायखेडा गावाजवळ नाकाबंदी सुरू असतांना आयशर ट्रक क्र. एम.एच.-41-ये.यु.-1715 भरधाव वेगाने येत असल्याने पोलिसांना संशय आल्याने त्यांनी ट्रक थांबवला. यावेळी आयेशर चालक किशोर वसंत ठाकरे (20, रा. बिजोरसे, ता. बागलाण) याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी ट्रकमध्ये चढून तपासणी केली असता गोनपाटच्या थैल्यांमध्ये तंबाखूजन्य गुटखा पानसाठा भरल्याचे आढळून आले.

हा संपुर्ण माल गुजरात राज्यातून विक्रीसाठी आणल्याचे व तो नामपूर येथील व्यापारी महेंद्र वसंत अहिरे यांच्या मालकीच्या असल्याची कबुली दिली. गुटखा, पानमसाला, तंबाखू आदी 20 लाख 97 हजार 800 रूपये किंमतीचा गुटख्याचा साठा तसेच 7 लाख रूपये किंमतीचा आयशर ट्रक असा सुमारे 27 लाख 98 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करीत याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.