दीड लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक

दीड लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक

मालेगाव । प्रतिनिधी

शहरातून गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी जात असल्याच्या गुप्त माहितीवरून विशेष पोलीस पथकाने ट्रकमधून नेण्यात येणारा 1 लाख 58 हजारांचा 31 किलो गांजा जप्त केला. ट्रकसह पोलिसांनी सुमारे 7 लाखाचा एैवज जप्त केला असून दोघा संशयितांना अटक केली आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या विशेष पोलीस पथकास गुप्त माहिती मिळाली होती. पोलीस अधीक्षक सचिन पाटील, खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाने रमजानपुरा पोलिसांच्या सहाय्याने देवरे मळा भागात सापळा लावून गांजाची वाहतूक होत असल्याचा संशय असलेला ट्रक (एम.एच.41-जी-7165) पकडला. या ट्रकमध्ये 1 लाख 58 हजाराचा 31 किलो गांजा आढळून आला.

यात साडेपाच लाखाच्या ट्रकसह सुमारे 7 लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी ट्रकमधील संशयित शेख असलम शेख उस्मान (रा. मालेगाव) व अक्रम खान अब्बास खान (रा. गुजरात) या दोघांना अटक करण्यात आली असून रमजानपुरा पोलिसात अंमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल दुपारी दोघा संशयितांना न्यायालयात उभे केले असता त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com