पानटपरी चालकाकडून प्रतिबंधित साहित्य हस्तगत

गुन्हे शाखा १ च्या पथकाची कारवाई
पानटपरी चालकाकडून प्रतिबंधित साहित्य हस्तगत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गुन्हे शाखा युनिट क्र.१ च्या (Crime Branch Unit No.1) पथकाने गंगापूर रोडवर (gangapur road) एका पानटपरीवर धाड टाकून प्रतिबंधीत इलेक्ट्रॉनिक सिगारेट (electronic cigarettes) व तंबाखु (tobacco) युक्त हुक्काचे पाकीट व इतर प्रतिबंधीत साहित्य साधने असा ६२ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून एकास अटक केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नाशिक शहरातील (nashik city) बऱ्याच शाळा (school) व महाविद्यालयातील (college) काही तरुण मुले व्यसनाधीन झाले असून ते नशा करत असल्याचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Police Commissioner Jayant Naiknavare) यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी बेकायदेशीर व प्रतिबंधित नशेच्या वस्तू विक्री करणाऱ्यांचे आदेश दिले होते.

यावरून गुन्हे शाखा उपायुक्त प्रशांत बच्छाव (Crime Branch Deputy Commissioner Prashant Bachhav), सहाय्यक आयुक्त वसंत मोरे (Assistant Commissioner Vasant More) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्र.१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ (Senior Police Inspector Vijay Dhamal) यांनी त्यांच्या पथकाला सदरहू व्यक्तींचा शोध घेण्यास सांगितले होते.

गुन्हेशाखा युनिट क्र. १ चे सहाय्यक उपनिरीक्षक रविंद्र बागुल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विष्णु उगले, अंमलदार रविंद्र बागुल, आसिफ तांबोळी, नाझिमखान पठाण, विशाल देवरे, प्रशांत मरकड यांचे पथकाने सापळा रचून गंगापूर रोडवरील नेर्लेकर सर्कल येथील जय गणेश स्टोअर या पानटपरीचा चालक प्रकाश राजाराम जाधव (३५ रा. एरंडवाडी, पेठफाटा, पंचवटी, नाशिक) यास ताब्यात घेवुन

त्याच्याकडे चौकशी केली असता पोलिसांनी त्याच्याकडून इलेक्ट्रॉनिक सिगारेट व तंबाखु युक्त हुक्काचे पाकीट व इतर प्रतिबंधीत साहित्य साधने असा ६२ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. संशयित जाधव याच्या विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com