'सिल यात्रा' पुर्वाचंलला उर्वरित भारताशी जोडणारी: डॉ. भारती पवार

'सिल यात्रा' पुर्वाचंलला उर्वरित भारताशी जोडणारी: डॉ. भारती पवार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अभाविपच्या माध्यमातुन पुर्वाचंलला प्रेमाने, भावनेने इतर भारताशी जोडणारी सिल यात्रा (SEIL Yatra) राष्ट्रीय एकात्मता (National integration) वाढवणार पाऊल आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) पहिल्या दिवसापासून पूर्वांचलला इतर भारताशी जोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अभाविपचा हा कार्यक्रम त्याच भावनेला बळ देणारा आहे. असे प्रतिप्रादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) यांनी केले.

त्या ‘सिल’ (स्टूडंटस् एक्स्पेरिअन्स इन इंटर स्टेट लिवींग) (Students' Experience in Interstate Living) कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांच्या (students) गुणगौरव कार्यक्रमात बोलत होत्या. या उपक्रमातर्गंत अभाविपच्या वतीने आयोजित भारतीय एकात्मता यात्रेच्या पुर्वाचंलच्या विद्यार्थीच्या नागरी सन्मान सोहळ्या प्रसंगी बोलत होत्या.

यावेळी अभाविपचे पुर्व राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मिंलीद मराठे यांनी अभाविपचा हा प्रकल्प 1987 पासून सूरू असल्याचे सांगितले. ‘सील’चे (SEIL) अशाप्रकारचे 16 गट आहे. त्यात 450 विद्यार्थी आहेत. एक गट चार राज्यात जातो. तेथील लोंकाशी संस्कृतीचे देवाण-घेवाण होते. भारतीय एकात्मतेची भावना (sense of Indian unity) निर्माण होत असल्याचे सांगितले.

यावेळी उपक्रमात सहभागी पुर्वाचलचे सदस्य अनुचल डोले म्हणाले आज मला खर्‍या अर्थाने अभिमान वाटतो, पहिल्यादा भारताच्या इतर प्रांतातून भारत मातेचा एक मुलगा म्हणुन स्वागत झाल. या उपक्रमांतर्गत विविध ठिकाणी आम्हाला नवनवीन परिवार भेटले. तेथे त्यांचे भरपूर प्रेम लाभले. मी जीवनात 'ईडली डोसा' मी फक्त टिव्हीमध्ये बघितला होता. परंतु तो केरळला आल्यावर पहिल्यांदा खायला ज्ञिळाला असल्याचे सांगितले.

यावेळी व्यासपीठावर या वेळी अभाविप पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मिलींद मराठे, सील यात्रेचे स्वागत अध्यक्ष हेमंत राठी, स्वागत समिती सचिव संजय किर्तने, महानगर अध्यक्ष प्रदिप वाघ, महानगर मंत्री ओम मालुंजकर व अनुचल डोले सील सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रावणी मोरे हीने केले तर आभार संजय किर्तने यांनी मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com