दोन वर्षानंतर भरली शाळा; मधल्या सुट्टीसह मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटीने आनंदोत्सव

दोन वर्षानंतर भरली शाळा; मधल्या सुट्टीसह मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटीने आनंदोत्सव

नवीन नाशिक | वार्ताहर New Nashik

कोरोना महामारीमुळे (Corona Outbreak) मागील दोन वर्षापासून विद्यार्थी विना ओस पडलेल्या शाळा आज पुन्हा सुरू झाल्याने विद्यार्थी पालक व शिक्षकांनी मध्ये चैतन्य निर्माण झाले....(secondary school started from today)

आज पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असली तरी शाळेत येण्याचा आनंद विद्यार्थ्याच्या चेहऱ्यांवर दिसून येत होता. कोरोना महामारी मुळे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या शाळा विद्यार्थी विना ओस पडलेल्या होत्या. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अध्यापन केले जात होते.

ऑनलाइन पद्धतीच्या शिक्षणामुळे विद्यार्थी व शिक्षकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. घरी बसून ऑनलाइन पद्धतीने (Online Education) शिकवणे सुरू असल्याने पालक वर्गातही चिंतेचे वातावरण होते.

मध्यंतरी आठवी ते बारावीचे काही वर्ग सुरू झाले असले तरी विद्यार्थ्यांचे लसीकरण न झाल्याने अनेकांनी आपल्या पाल्याला शाळेत पाठवले नव्हते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पालकांनीही शासन, शिक्षण विभागाकडे शाळा सुरू करण्याच्या मागण्या केल्या होत्या.

शासनानेही शाळांना सूचना करत नियमांचे पालन करीत पालकांचे संमतीपत्र देत लसीकरण असल्यासही विद्यार्थ्यांना शाळेत बसू देण्यास सांगितलेले आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत टप्प्याटप्प्याने मोठ्या वर्ग पासून शाळा सुरू करायला शासनाने सुरुवात केली होती. त्याच अनुषंगाने आज शाळेची घंटा वाजली. नवीन नाशिक (New Nashik) इंदिरानगर पाथर्डी परिसरातून (Indiranagar Pathardi Area) अनेक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली आपल्या पाल्याला शाळेत सोडायला आलेल्या पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद मावत नव्हते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com