'मिशन इंद्रधनुष्य'ची दुसरी फेरी : दुर्लक्षित बालकांचे होणार लसीकरण

'मिशन इंद्रधनुष्य'ची दुसरी फेरी : दुर्लक्षित बालकांचे होणार लसीकरण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात नियमित लसीकरणापासून (Vaccination) वंचित राहिलेल्या बालकांना लस देण्यासाठी मार्च 2022 पासून दर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सात दिवस 'मिशन इंद्रधनुष्य' (Mission Indradhanush) ही मोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत दुसरी फेरी आता सुरू करण्यात आली आहे....

जिल्ह्यातील नियमित लसीकरणापासून (Vaccination) वंचित राहिलेले बालके (Childrens) यामध्ये कामगार वस्त्या, ऊस तोड, बांधकामावरील कामगार, मजूर वस्त्या, स्थलांतरित तांडे आदी ठिकाणावरील कामामुळे दुर्लक्षित राहिलेल्या बालकांना शोधून या सात दिवसांमध्ये त्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.

यासाठी आरोग्य विभागाने (Health Department) विशेष प्रयत्न केले असून सर्वेक्षण (Survey) करून लाभार्थी यादी बनवण्यात आली आहे. तसेच त्यांच्या वेळेनुसार कामाच्या ठिकाणी जाऊन मुलांना व गरोदर मातांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरावरून मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Leena Bansod) यांच्या मार्गदर्शनानुसार सनियंत्रण केले जात आहे.

'मिशन इंद्रधनुष्य'ची दुसरी फेरी : दुर्लक्षित बालकांचे होणार लसीकरण
कादवा कारखान्यावर विकास पॅनलची सत्ता; पाहा संपूर्ण निकाल 'इथे'

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. कैलास भोये यांच्यामार्फत सनियंत्रण करण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय येथील मिशन इंद्रधनुष्य परिवेक्षक डॉ. अंकुर राघव यांनी प्रत्यक्ष नाशिक येथे येऊन त्रंबकेश्‍वर, इगतपुरी, आदिवासी दुर्गम भागात जाऊन वीटभट्टी कामगार वस्ती येथील कामाचे मूल्यमापन केले.

'मिशन इंद्रधनुष्य'ची दुसरी फेरी : दुर्लक्षित बालकांचे होणार लसीकरण
राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मुस्लीम पदाधिकाऱ्यांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

तसेच रात्री व सायंकाळी होणाऱ्या लसीकरणालाही विशेष करून भेट दिली व कामातील त्रुटी दूर कशा कराव्यात, याविषयी मार्गदर्शन केले. निफाड व येवला तालुका येथेही ते भेट देणार आहे. डॉ अंकुर राघव व जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. कैलास भोये यांच्यामार्फत या कामाचे मूल्यमापन व तपासणी करण्यात येत आहे़.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com