
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महाराष्ट्र शासनाच्या (Government of Maharashtra) सार्वजनिक आरोग्य विभागाने (Department of Public Health) निर्देशीत केल्याप्रमाणे नाशिक महानगरपालिकेकडून (Nashik Municipal Corporation) 15 जानेवारीपासून 25 जानेवारीपर्यंत गोवर (Measles), रुबेला (Rubella) लसीकरण (vaccination) मोहिमेच्या दुसरा टप्पा राहणार आहे.
शहरात विशेष वंचित लाभार्थ्यांसाठी लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेच्यापहिल्या (Vaccination campaign) टप्प्यात दि. 15 डिसेंबर 2022 ते 25 डिसेंबर 2022 या कालावधीत एकूण 2,338 बालकांचे लसीकरण करण्यात आले. त्यात आरोग्य सेविका (Health worker) यांच्या मार्फत ‘एमआर 1’ चा डोस 1,135 तर ‘एमआर 2’ चा डोस 1,203 बालकांना देण्यात आला आहे.
मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अजिता साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम पार पडत आहे. 15 जानेवारी ते 25 जानेवारी या दुसर्या टप्प्यातील कालावधीत नाशिक शहरातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.
डोस राहिलेल्या बालकांची यादी तयार
या मोहिमेत महापालिका क्षेत्रात आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे. 9 महिने ते 5 वर्षे वयाच्या बालकांचा गोवर रुबेला लसीचा पहिला किंवा दुसरा डोस अथवा दोन्ही डोस राहिलेल्या बालकांची यादी तयार करण्यात आली आहे. लसीच्या दोन डोसमधील अंतर 28 दिवस असेल याची खबरदारी घेण्याची सूचना शासनाच्या आरोग्य विभागाने केली आहे.
या मोहिमेत स्थानिक वैद्यकीय व्यवसायिक संघटना आणि बालरोग तज्ज्ञ संघटना यांचाही सहभाग असावा, अशीही सूचना देण्यात आली आहे. लसीकरणाच्या सर्व्हेक्षणाला येणार्या कर्मचार्यांना नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.