
नाशिक | प्रतिनिधी Nashik
इंदिरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या मुलीला मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने औरंगाबाद येथून ताब्यात घेऊन इंदिरा नगर पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत (Within the limits of Indiranagar Police Station)एक अल्पवयीन मुलगी हरवल्याची तक्रार (Complaint of missing minor girl )दाखल करण्यात आली होती.
पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी शहरातील पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयातील अपहृत मुला,मुलींचा शोध घेण्याबाबत मध्यवर्ती गुन्हेशाखे अंतर्गत अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षास आदेश दिलेले होते.मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर अल्पवयीन मुलगी हि वडगांव कोल्हाटी, औरंगाबाद येथे असल्याचे समजले.
यावरून पथकाने औरंगाबाद येथे जाऊन सदर अल्पवयीन मुलगी व संशयिताला ताब्यात घेऊन नाशिकला आणून इंदिरानगर पोलिसांच्या हवाली केले. ही मोहीम पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त गुन्हे संजय बारकुंड, सहाय्यक आयुक्त गुन्हे वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हेशाखेचे वपोनी डॉ. अंचल मुदगल, सपोनि धर्मराज बांगर, सपोउनि. शंकर गोसावी, गणेश वाघ, वैशाली घरटे यांनी संयुक्तरित्या पार पाडली.