इगतपुरी रेव्ह पार्टीत ड्रग्ज पुरवणार्‍या तिघांचा शोध सुरू

चार जणांना 9 दिवस पोलीस कोठडी, रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत
इगतपुरी रेव्ह पार्टीत ड्रग्ज पुरवणार्‍या तिघांचा शोध सुरू

नाशिक | Nashik

इगतपुरी रेव्ह पार्टी (Igatpuri Rave Party) प्रकरणी कोकेनसह अंमलीपदार्थ उपलब्ध करून देणार्‍या एका नायजेरीयनसह तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 9 दिवसांची पोलिस कोठडी (Police Closet) सुनावली आहे.

तर अभिनेत्रीसह उर्वरीत सर्वांना एक दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. तर सर्वांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाने सांगीतले.

इगतपुरी येथील स्काय ताज व्हिला (Sky Taj Villa) आणि स्काय लगून व्हिला या दोन खासगी बंगल्यांमध्ये शनिवारी (दि.26) मध्यरात्रीच्या सुमारास ड्रग्ज, कोकेन, हुक्कासारखे अंमली पदार्थांची नशा करत बॉलिवुडशी (Bollywood) संबंधित चार महिलांसह एकुण 22 उच्चभ्रू व्यक्तींचा धिंगाना सुरू असल्याची गोपनीय माहिती नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील ( Police Officer Sachin Patil) यांना मिळाली होती.

त्यांच्यासह अपर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर (Police officer Sharmistha Balatkar) आणि इगतपुरी पोलिसांच्या पथकाने या बंगल्यावर पहाटेच्या सुमारास छापा मारला.

यावेळी पोलिसांनी अंमली पदार्थांची नशा करत ‘रेव्ह पार्टी’च्या नावाखाली धिंगाणा घालणार्‍या सर्वांना ताब्यात घेत पोलिस वाहनातून इगतपुरी पोलीस ठाण्यात (Igatpuri Police Station) आणले होते.

याप्रकरणी विनापरवाना अंमली पदार्थ बाळगणे व त्याचे सामुहिकपणे सेवन करणे आणि कोरोनाच्या नियमावलीचे उल्लंघन (Corona crisis) करत एकत्र येऊन गर्दी जमविल्याप्रकरणी विविध कलमान्वये संबंधितांविरुध्द इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Case Filed) करण्यात आला आहे.

हा गुन्हा तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून, ड्रग्ज प्रकरणी नायझेरियन तरून हा महत्वाची कडी असून त्या अनुषगांने नावे निष्पन्न झालेल्या आणखी तिघांचा ग्रामिण पोलीस शोध घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com