शहरात बेघरांची शोध मोहीम; 'इतके' जण निवारा केंद्रात दाखल

शहरात बेघरांची शोध मोहीम; 'इतके' जण निवारा केंद्रात दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महानगरपालिकेतील दीनदयाळ अंत्योदय योजना (Deendayal Antyodaya Yojana)-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान विभागामार्फत शहरात विविध ठिकाणी बेघर शोध मोहीम (Homeless search campaign) राबविण्यात आली.

एकूण 32 जणांना निवारा केंद्रात (shelter centers) दाखल करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner and Administrator Dr. Chandrakant Pulkundwar) यांच्या आदेशानुसार उपायुक्त करुणा डहाळे (Deputy Commissioner Karuna Dahale) यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविण्यात आली.

शहरातील फुटपाथ (sidewalk), रेल्वे स्थानक (railway station), बस स्थानक (bus station), धार्मिक स्थळे परिसर आदी ठिकाणी रात्रीच्या वेळी उघड्यावर झोपणार्‍या बेघर नागरिकांना मूलभूत सोई सुविधायुक्त निवारा उपलब्ध करून देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. शहरातील उड्डाणपुल (flyover), गंगाघाट, रामकुंड परिसरात 19 जानेवारीला रात्री 8 ते रात्री 12 या कालावधीत बेघर नागरिक शोध मोहीम यशस्वीपणे राबविणेत आली.

यात मनपाचे डे -एनयुएलएम विभागाचे (De-NULM Division) शहर अभियान व्यवस्थापक, समूह संघटक, अतिक्रमण विभाग कर्मचारी, पोलीस प्रशासन तसेच बेघर निवारा केंद्राचे विनामूल्य देखभाल व व्यवस्थापन करणारी संस्था श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान, त्र्यंबकेश्वर यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शहरातील रात्रीच्या वेळी उघड्यावर, फुटपाथवर झोपणार्‍या बेघर नागरिकांना निवारा केंद्रा बाबतची माहिती देण्यात आली. निवारा केंद्रात आसरा घेणे बाबत समुपदेशन करण्यात आले. त्यातील एकुण 32 वृद्ध, रुग्ण आणि दिव्यांग बेघर नागरिकांना मनपाचे वाहनामार्फत निवारा केंद्रात दाखल करण्यात आले.

मनपा अंतर्गत कार्यरत तपोवन येथील स्वामी विवेकानंद बेघर निवारा केंद्र महानगरपालिका आणि त्रंबकेश्वर येथील श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येत आहे. बेघर नागरिकांना निवारा केंद्रात दाखल केल्यानंतर संस्थेमार्फत तात्काळ अंथरुण, पांघरूण, साहित्य आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली.

शहरात फुटपाथ, सिग्नल, पुलाखाली किंवा इतरत्र कोठे बेघर नागरीक आढळल्यास सामाजिक भावनेतून अशा नागरिकांना निवारा केंद्रात दाखल करावे किंवा त्याची माहिती मनपाच्या डे -एनयुएलएम विभागाला कळवावे. शहरात रात्रीच्या वेळी उघड्यावर बेघर व्यक्ती आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन मनपा उपायुक्त करुणा डहाळे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com