महानगरपालिका
महानगरपालिका
नाशिक

महापालिकेच्या शिक्षकांकडुन 'त्या' वृध्दांचा शोध

आता सर्वेक्षण होणार

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

शहरातील करोना प्रादुर्भाव रोकण्यसाठी महापालिकेकडुन प्रभावी उपाय योजना केल्या जात असतांना आता करोना मृत्यु रोखण्यासाठी आता महापालिका शिक्षकांकडुन रक्तदाब, दमा, साखर असे आजार असलेल्या रुग्णांचा प्रतिबंधीत क्षेत्र व झोपडपट्टी भागात शोध घेऊन यांची माहिती जमा करण्याचे काम महापालिकेच्या शिक्षकांवर सोपविण्यात आले आहे. या वृद्धांची काळजी घेऊन मृत्युदर कमी करण्यासाठी महापालिकेकडुन प्रयत्न सुरु झाले आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रात करोना संसर्ग वाढत असतांना यावर उपाय म्हणुन मनपा आरोग्य विभागाकडुन आता अ‍ॅटीजेन रॅपिड टेस्ट सुरु करण्यात आल्या आहे. तसेच आत्तापर्यत करोनामुळे मृत्यु झालेल्यात 60 - 65 वर्ष वयोगटापुढील वृध्दांचा मृत्यु मोठ्या प्रमाणात झाला असुन हे प्रमाण सरासरी 65 टक्क्याच्या वर गेले आहे. या मृत्यु मागील कारणांचा महापालिककेकडुन अभ्यास करण्यात आल्यानंतर यातील वृध्दांना दमा, डायबेटीस, रक्तदाब, कॅन्सर आदी आजार असल्याने हे आजार देखील त्यांच्या मृत्युला कारणीभूत ठरल्याचे समोर आले होते. यामुळे आरोग्य सर्व्हेत बालके व वृद्धांच्या तपासण्यावर पहिल्या टप्प्यात भर देण्यात आला होता.

आता वृध्दांचे मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी आता महापालिकेकडुन प्रतिबंधीत क्षेत्र व शहरातील झोपडपट्टी भागात असलेले वृध्दांची माहिती नोंदवुन घेण्यासाठी शिक्षकांची नेमणुक केली आहे. शहरातील सहा विभागात महापालिकेच्या 1 हजार शिक्षकांपैकी 60 शिक्षकांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हे शिक्षक त्या त्या भागात जाऊन वृध्दांची माहिती नोंदविणार असुन त्यांना यावर उपचार घेण्यासंदर्भात व काळजी घेण्यासंदर्भात महापालिकेकडुन काळजी घेतली जाणार आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com