नाशिकरोड येथील उत्सव मंगल कार्यालय सील

अनेक विनापरवाना लावलेले फलक 'हटवले
नाशिकरोड येथील उत्सव मंगल कार्यालय सील
USER

नाशिकरोड । Nashik

नाशिकरोडला (Nashikroad) कोविड लसीकरण सेंटरवरील (Corona Vaccination Center) राजकीय फलक हटविण्याची तसेच वाढदिवसाचे विनापरवाना लावलेले फलक (Birthday Banner) आणि राजकीय ध्वज हटविण्याची मोहिम महापालिकेच्या अतिक्रण विभागाने (NMc Encrochment Department) तीव्र केली आहे.

दरम्यान, सोशल डिस्न्टिसिंग (Social Distnsing) तसेच कोविड विषयक नियमांचे पालन न केल्याबद्दल नाशिकरोड येथील उत्सव मंगल कार्यालय सील (Utsav Mangal Karyalay Seal) करण्यात आले आहे. उपनगर पोलिस व महापालिकेने (NMC Action) ही कारवाई केली. अशा धडाकेबाज कारवाई अतिक्रमण विभाग कायम ठेवणार केल्याची माहिती विभागीय अधिकारी संजय गोसावी (Information Divisional Officer Sanjay Gosavi) यांनी दिली.

मंगल कार्यालयात कोविड विषयक नियमांचे पालन केले जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. याप्रकरणी कठोर कारवाईचे आदेश प्रशासनाने दिले होते. त्यानुसार उत्सव मंगल कार्यालयावर कारवाई (Action on Marriage Hall) करण्यात आली. उपनगर पोलिसांनी UPnagar Police) नुकताच गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर महापालिकेला काल पत्र दिले.

महापालिकेने कार्यालय सील केले. महापालिकेचे विभागीय अधिकारी संजय गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी, जनार्दन घंटे, विकास शेळके, विजय जाधव, भरत गायकवाड, प्रमोद मारू, सागर बारगळ तसेच उपनगर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक तेजल पवार, हवालदार संतोष, किसन काकड यांनी कारवाई केली.

नाशिकरोडला विविध लसीकरण केंद्र महापालिकेने सुरु केली आहेत. मात्र, लोकप्रतिनिधी, नेत्यांनी तेथे आपले फोटो असलेले फलक लावलेले आहेत. ते हटविण्यास सुरुवात झाली आहे. अतिक्रमण विभागाने दोन दिवसांत 120 फलक हटविले.

अतिक्रमण विभागाचे गोरख काळे, सहाय्यक अधिक्षक रमाकांत क्षीरसागर, उदय धोंगडे, वाहनचालक मुठाळ आदींनी ही कारवाई केली. विनापरवाना लावलेले वाढदिवसाचे फलक, राजकीय पक्षांचे झेंडे हटविण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. आणखी दोन दिवस अतिक्रमणची मोहिम सुरु राहणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com