कोयत्याने हल्ला करणारे जेरबंद

कोयत्याने हल्ला करणारे जेरबंद

नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad

येथील बिटको हॉस्पिटल ( Bytco Hospital ) समोर बुधवारी रात्री एका डॉक्टरवर कोयत्याने हल्ला (A doctor was attacked with a scythe)करून तसेच त्यांच्याकडील रोख रक्कम चोरून येणाऱ्या तिघांना अटक केली असून यातील एक आरोपी अद्याप फरार आहे. दरम्यान आणखी एका घटनेत नाशिक रोड पोलिसांनी एका संशयिताला अटक करून त्याच्याकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहे.

बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास हॉस्पिटल समोर डॉक्टर ओंकार पाटील ( Dr. Omkar Patil )हे मोबाईल फोनवर बोलत असताना दोन दुचाकी गाडीवर चार हल्लेखोर आले व त्यांनी पाटील यांना शिवीगाळ व मारहाण करून त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला पाटील यांनी विरोध केला असता एकाने जवळ असलेल्या कोयत्याने डॉक्टर पाटील यांच्यावर हल्ला केला व जखमी केले त्यानंतर इतर ठिकाणी त्यांच्या खिशातील रोकड काढून पलायन केले.

या घटनेनंतर पाटील यांनी नाशिकरोड पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती या तक्रारीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पोलीस निरीक्षक गणेश न्याय दे राजू पाचोरकर त्यांचे सहकारी उपनिरीक्षक योगेश पाटील जयेश गांगुर्डे गुन्हे शोध पथकाचे हवालदार अनिल शिंदे मनोहर शिंदे विशाल पाटील संदीप बागुल देवरे विष्णू गोसावी कुंदन राठोड राकेश बोडके केतन कोकाटे जाधव आदींनी सापळा रचून प्रणव प्रदीप इंगळे राहणार गांधीधाम देवळाली गाव शाहिद सय्यद राहणार शेख मंजिल टाऊन हॉल शेजारी सत्कार पॉइंट देवळाली गाव व यज्ञेश उर्फ ज्ञानेश्वर शिंदे राहणार सुभाष रोड नाशिक रोड यांना शिताफीने अटक करून त्यांच्याकडून कोयता व रोख रक्कम जप्त करण्यात आले यातील चौथा आरोपी कलाम मंसुरी हा अद्याप फरार आहे.

त्याचप्रमाणे आणखी एका घटनेत मालधक्का रोड जवळील तक्षशिला शाळेजवळ संशयित रित्या फिरणाऱ्या शैलेश गोपीचंद सहारे याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा व जिवंत काडतूस तसेच मोबाईल आढळून आला त्याची चौकशी केली असता तो रेवगडे चाळ साई मंदिरा जवळ पाटील गॅरेज पाठीमागे राहणार असल्याचे चौकशीत आढळून आले.

नाशिक रोड पोलिसांनी ( Nashikroad Police )केलेल्या या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे उपायुक्त विजय खरात सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांनी अभिनंदन केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com