ओझर येथे चालकास मारहाण करून स्कार्पिओ पळवली
नाशिक

ओझर येथे चालकास मारहाण करून स्कार्पिओ पळवली

अज्ञात चौघांविरूध्द गुन्हा दाखल

Gokul Pawar

Gokul Pawar

ओझर | Ozar

येथील मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या एचएएल उड्डाणपुलाजवळ चालकास मारहाण करीत स्कार्पिओसह मोबाईल असा एकूण ३ लाख ५५ रूपयांचा ऐवज लंपास करीत पलायन केले.

अधिक माहिती अशी की, (दि.१७) एचएएललगतच्या सर्व्हिस रोडवर एक स्कार्पिओ गाडी अडवून चालक सचिन दतात्रय सांळूके यांना गाडीतून बाहेर ओढून मारहाण करून चौघा अज्ञात चोरट्यांनी स्कार्पिओसह मोबाईल लांबविला.

याबाबत ओझर पोलिसांनी अज्ञात चौघा चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक अजय कवडे करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com