
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सध्या शंभर शाळा (school) आदर्श होत असल्या तरी आगामी काळात एक हजार शाखा आदर्श केल्या जातील,
या वर्ष ज्या शाळा चांंगले काम करुन दाखवतील त्यांना एक लाखााचा विशेष पुरस्कार शासन स्तरावरुन दिला जाईल अशी घोषणा आज पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांनी आज येेथे केली.
स्व. आर.आर (आबा) पाटील तालुका सुंंदर गाव पुरस्कार आज 15 गावाना श्री भुसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधासभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narahari Jirwal, Deputy Speaker of the Legislative Assembly), खा. हेमंत गोडसे (MP Hemant Godse), आ. हिरामन खोसकर (MLA Hiraman Khoskar), माजी उपमहापौर अजय बोरस्ते उदय सांगळे, भास्कर बनकर, मुख्य कार्यकारी अधीकारी अशीमा मित्तल (Chief Executive Officer Ashima Mittal), अतीरीक्त मुख्य कार्यकारी अधीकारी डॉ. अर्जुन गुंडे (Additional Chief Executive Officer Dr. Arjun Gunde), प्रतीभा संगमनेरे, प्रवीणसिंह परदेशी आदीं उपस्थीत होते.
दर वर्षी सोळा फेब्रुवारीला आर आर. पाटील यांंच्या स्मरनार्थ सुंदर गावांंना हा पुरस्कार दिला जातो. जी गावे सुंंदर आहेत. ज्यांनी स्वच्छ भारत अभियान यशस्वी राबवीले. पारदर्शी कारभार केला. नवनवीन योजना राबवुन गावाला प्रगतीपथावर नेले. अशा गावांची यासाठी निवड केली. वडांंगळी (सिन्नर), वेळुंजे (त्रंबक) , शिरसाठे ( इगतपुरी), थेरगाव( निफाड), सुळ (कळवण), बोरोळे (नांंदगाव),
राजदेरवाडी ( चांदवड), दरी (नाशिक), भारदेनगर( मालेगाव), कोपुर्ली (पेठ), महालखेडा(येवला), पिंपळदर( बागलान), करंजंवन (दिंडोरेी) , वरवंंडी ( देवळा), बुबळी (सुरगाणा) या गावांचे सरपंच, ग्रामसेकव, तालुक्याचा गट विकास अधीकारी यानी हा पुरस्कार स्विकारला.. खेडगाव व शिरसाटे या दोन गावांना जिल्हस्तरीय पुरस्कारही प्रदान करण्यात आला. त्यांना प्रत्येकी 20 - 20 लाखाचे पुरस्कार मिळाले.
यावेळी भुसे यांनी पुरस्कार (Award) प्राप्त गावांचे अभानंदन केले. या पुरस्काराच्या रकमेचा उपयोग गावाच्या विकसासाठी करा. भविष्यात ही असेच नवनवीन उपक्रम राबवा अशी अपेक्षा व्यक्त केली. झिरवाळ यांंना शाळा, आरोग्य व पाणी पुरवठाा या विषयाकडे सरपंंचांचे लक्ष्य वेधुन यात कमी पडु नका आदर्श काम करुन कायम स्वरुपी ठसा उमटवा असे आवाहन केले.
विविध किसे सांगन त्यांंनी चांगलाच करमणुक केली. त्यांच्या प्रत्येक उदाहरणाला हशा आणि टाळ्यांंचा प्रतीसाद मिळाला. मित्तल यांनी स्वागत केले. कोळी यांनी आभार मानले. मुख्य लेखा व वित्त अधीकारी महेश बच्छाव, जिल्हा आरोग्य अधीकारी नेहते, व्ही.डी. गर्जे, आदींंसह अधीकारी तसेच गावचे कारभारी मोठ्या संख्यने उपस्थीत होते.