सोळा महिन्यांनी पुन्हा भरली शाळा; सिन्नर तालुक्यात विद्यार्थ्यांच्या आनंदाला उधाण

सोळा महिन्यांनी पुन्हा भरली शाळा; सिन्नर तालुक्यात विद्यार्थ्यांच्या आनंदाला उधाण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयासह सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) काही शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. शासनाच्या व शिक्षण विभागाच्या दुटप्पी धोरणामुळे पालक व शिक्षक अस्वस्थ झाले होते...

शासन (Government) व शिक्षण विभाग (Education Department) शाळा सुरू करण्याबाबत दररोज आपले निर्णय बदलत असल्याने नाराजी होती. शासनाने विद्यार्थ्यांचे (Students) तातडीने लसीकरण (Vaccination) करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत होती.

यामुळे प्रकाराला पालक अक्षरशः कंटाळले होते. त्यांना त्यांच्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य घडवायचे म्हणून ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, पालक यांनी पुढाकार घेऊन आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी स्वतःच्या जबाबदारीवर इयत्ता ८वी, ९वी १० वी चे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात पालक ग्रामपंचायत पाडळी, आशापुर, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन पालकांनी आपल्या पाल्याची जबाबदारी घेऊन प्रत्यक्षात मुलांना शाळेत आणून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

निर्णयाला बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव लोखंडे (Govindrao Lokhande), सचिव प्रा. टी. एस. ढोली (T.S. dholi), विश्वस्थ अरुण गरगटे (Arun Gargate) यांनी संमती दिली.

शिक्षक (Teachers) वाड्यावस्त्यांवर जाऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करत होते. शासनाने ४५ दिवसाचा सेतू अभ्यासक्रम पूर्ण करण्यास सांगितला. तो पूर्ण करून घेण्यासाठी आजही शिक्षक वाड्या-वस्त्यांवरती जाऊन अध्यापनाचे काम करत आहे.

परंतु आता पालकांनीच पुढाकार घेऊन इयत्ता आठवी ते दहावीची वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी पुढाकार घेतला. सर्व पालकांची संमती घेऊन आजपासून शाळेला सुरुवात केली.

यासाठी पाडळी गावच्या सरपंच सुरेखा रेवगडे, सुधीर रेवगडे, आशापुरचे सरपंच विष्णुपंत पाटोळे यांनी ग्रामपंचायतीचा ठराव दिला. यासाठी चंद्रभान रेवगडे, धनंजय रेवगडे, रघुनाथ पाटोळे, अशोक रेवगडे, तुकाराम रेवगडे, प्रल्हाद रेवगडे यांनी पुढाकार घेतला.

शिक्षक बी. आर. चव्हाण, आर. व्ही, निकम, एस. एम, कोटकर, आर. टी. गिरी, एम. सी. शिंगोटे, एम.एम. शेख, सविता देशमुख, टी. के. रेवगडे, सी. बी, शिंदे, के. डी. गांगुर्डे यांनी सहभाग घेतला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com