पंचसुत्रीचा अवलंब करा

शिक्षणाधिकारी कदम यांचे मुख्याध्यापकांना आवाहन
पंचसुत्रीचा अवलंब करा

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

कोरोनाच्या (corona) पार्श्वभुमीवर शाळा (schools) सुरु झाल्या असल्या तरी जिल्ह्यातील सर्व शाळांतील मुख्याध्यापकांनी (Headmaster) पंचसुत्रीचा अवलंब करून शाळा चालवाव्यात असे आवाहन माध्यमिकचे जिल्हा शिक्षणाधिकाऱी मच्छिंद्र कदम यांनी केले.

मुख्याध्यापक संघासोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होतेे. अध्ययन (Study) व अध्यापनावर (Teaching) भर देणे, गुणवत्ता वाढीसाठी प्रश्ननिर्मिती करणे, चित्र संकल्पना अमलात आणणे, भूगोल (Geography)-विज्ञान (Science) विषयांवर आधारित चित्र तयार करून घेणे, योगा-प्राणायम (Yoga-pranayama), प्रत्येक विद्यार्थ्याला (student) एक तरी झाड दरवर्षी लावायला सांगणे व त्याद्वारे काही गुणदान करणे, गायन, सहल अशा उपक्रमांच्या पी. पी. टी. तयार करण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या. यावेळी मुख्याध्यापक संघाने आपल्या काही मागण्या त्यांच्याकडे मांडल्या.

यात मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांना त्वरित मान्यता देणे, मुख्याध्यापकांना तीन वेळेस सह्यांचे अधिकार देणे व नंतर कायम स्वरूपी मान्यता देणे, डी. एड. (D.ed) व बी. एड. (B.ed) प्रलंबीत प्रस्तावांना मान्यता देणे, शालार्थ आय. डी. प्रस्ताव, संच मान्यता दुरुस्ती करणे, टी. एस. पी. 1901 या शाळांच्या शिक्षकांचे (teachers) पगार (salary) नियमित करणे, मविप्र (MVP) संस्थेतील 14 पैकी 13 शिक्षकांचे फरक बीले त्वरीत काढणे, पे युनिट कार्यालयातील प्रलंबित मेडीकल बीले, फरक बीले,

यासाठी त्वरित बी. डी. एस. ओपन करण्यासाठी पाठपुरावा करणे, दप्तर दिरंगाई होणार नाही याची काळजी घेणे, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या (Retired employees) लाभाच्या योजना त्यांना देणे या विषयांकडे शिक्षणाधिकार्‍यांचे लक्ष वेधण्यात आले. सर्व प्रलंबीत प्रश्न नोव्हेंबर अखेरपर्यंत सोडविण्याचे आश्वासन कदम व कक्ष अधिक्षक सुधीर पगार यांनी दिले.

यावेळी मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, सुरेश शेलार, प्रदिप सांगळे, संगीता बाफना, बी. डी. गांगुर्डे, दिपक व्याळीज, कैलास वाघ, आर. बी. एरंडे, भागिनाथ घोटेकर, रामनाथ लोंढे, नवनाथ पगार, माणिक भदाणे, महेन्द्र कुंवर, संजय देसले, संजय पवार, मोहन चकोर, सुरेश घरटे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थितीत होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com