Video : घंटा वाजली! चिमुकल्यांचे औक्षण करून स्वागत

येवला | प्रतिनिधी | Yeola

तब्बल दीड वर्षानंतर इयत्ता ५ वीच्या वर्गाची घंटा वाजली (Schools Reopen). याचा आनंद विद्यार्थ्यांइतकाच शिक्षकांनाही झाला. आज एरंडगाव येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात (Swami Vivekanand School) इयत्ता ५ वी ते ८ वी च्या मुलांचे आगमन होताच त्यांचे औक्षण करण्यात आले. विद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून वर्गापर्यंत रांगोळी काढण्यात आली होती...

२३ मार्च २०२० पासून शाळा बंद झाले होते. सुरुवातीच्या काळात ताळेबंदीमुळे घरात राहणे आवश्यक होते. मात्र जसेजसे करोनाचे (Corona) सावट अन भीतीही कमी होत गेली, तसेतसे विद्यार्थ्यांना शाळेची अन् शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या भेटीची ओढ लागली होती.

गेल्या दीड वर्षांपासून ऑनलाईन वर्गच सुरू होते. मात्र समोर बसलेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचे भाव हे आभासी पद्धतीच्या भेटीत टिपता येत नव्हते. त्यामुळेच शाळा लवकर भरवली जावी, अशी मागणी येथील पालक, शिक्षक, ग्रामपंचायत, आणि विद्यार्थ्यांचीही होती.

ती मागणी पूर्ण होताच आज विद्यार्थी नवे कपडे, नवे दप्तर घेऊन शाळेच्या आवारात वेळे अगोदरच दाखल झाले. प्राचार्य सुनील मेहेत्रे (Sunil Mehete) यांनी संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला कानडे (Shakuntala Kanade) यांच्या मार्गदर्शनाखाली करोनाचे सर्व नियम पाळून आज विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

यावेळी संचालक दिगंबर बाकळे, पर्यवेक्षक धर्मा कर्हे, लक्ष्मण बारहाते, राधिका रोहोम, भाऊसाहेब वाघ, माधुरी सूर्यवंशी, वंदना वरंदळ, सविता बोरसे, जयश्री पडोळ, वैशाली जाधव यांच्यासह शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com