
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महानगरपालिका शाळा (Municipal School) क्र. 27, 28 आणि माध्यमिक शाळा (Secondary School), सातपूर कॉलनी येथे दोन दिवसीय स्मार्ट गर्ल (smart girl) हा उपक्रम राबविण्यात आला होता.
उपक्रमाचा समारोप मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner and Administrator Dr. Chandrakant Pulkundwar) यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी डी मार्ट फाऊंडेशन (D Mart Foundation) मार्फत विकसित करण्यात आलेल्या संगणक, वाचनालय कक्ष आणि युवा अनस्टॉपेबल मार्फत विकसित करण्यात आलेल्या स्मार्ट क्लासरूमचे (Smart Classroom) उद्घाटन आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले. मनपा शिक्षण विभागा (Department of Education) मार्फत स्मार्ट स्कूल प्रकल्प (Smart School Project) हाती घेण्यात आला आहे.
सदर प्रकल्पांतर्गत प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्मार्ट स्कूल प्रकल्पांतर्गत डी मार्ट फाऊंडेशन (सी.एस.आर) यांच्या सहयोगाने नऊ शाळांसाठी संगणक कक्ष (computer room) आणि वाचनालय कक्ष विकसित करून डिजिटल लर्निंग प्रोग्राम व रीडिंग प्रोग्राम (Digital learning program and reading program) उपक्रम राबविण्यात येत आहेत.
पाच वर्षांसाठी उपक्रम
यातील प्रत्येक शाळेत 21 संगणक, सुमारे 2000 पुस्तके, फर्निचर , बोलक्या भिंती आणि इमारतीच्या दर्शनीय भागाचे रंगकाम करण्यात आले आहे. एकूण 17 तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हा उपक्रम पाच वर्षांसाठी राबविण्यात येणार आहे. याचा फायदा नऊ शाळांमधील सुमारे 4 हजार विद्यार्थ्यांना होणार आहे. यावेळी डी मार्ट फाऊंडेशनच्या पर्यवेक्षक प्राची माळी, स्मार्ट स्कूल प्रकल्प सल्लागार कंपनी पॅलेडियम कन्सल्टिंग इंडियाचे टीम सदस्य अंशुमन कुमार, हर्षद वाघ यांनी आयुक्तांना उपक्रमाची माहिती दिली.
भारतीय जैन संघटना, नाशिक यांच्या कडून 3 आणि 4 मार्च रोजी किशोरवयीन मुलींसाठी स्मार्ट गर्ल हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला होता. यावेळी आयुक्तांनी विद्यार्थिनी, पालकांसोबत संवाद साधला. विद्यार्थिनींनी ज्या आत्मविश्वासाने आपले अभिप्राय मांडले, त्याचे आयुक्तांनी कौतुक केले. भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर साखला यांनी उपक्रमाची माहिती दिली.
सामाजिक आव्हानांना सामोरे जाण्याच्या या काळात मुलींचे शाश्वत सक्षमीकरण करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. याचा अभ्यासक्रम किशोरवयीन मुलींच्या भावनिक वाढीशी संबंधित समस्या आणि चिंता दूर करतो. स्मार्ट गर्ल ट्रेनर्स राजेंद्र भूतडा, सुषमा गांधी आणि पारूल दिवाणी यांनी मुलींना मार्गदर्शन केले. पालकांचे समुपदेशन करण्यात आले.
उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी भारतीय जैन संघटनेचे राज्य सचिव दीपक चोपडा, राज्य सदस्य यतिश डुंगरवाल, नाशिक विभागीय अध्यक्ष ललित सुराणा, नाशिक सिटी चॅप्टर अध्यक्ष परेश बागरेचा, सचिव सिद्धार्थ शाह, खजिनदार नयन बुरड, उपाध्यक्ष संतोष मुथा, प्रणय संचेती, पीयूष बोरा, लोकेश कटारिया, शाळा केंद्रप्रमुख नितीन देशमुख, मुख्याध्यापिका छाया गोसावी, भास्कर कुलधर, सुरेश खांडबहाले यांचे सहकार्य लाभले.