निधी वर्ग होत नसल्याने शाळेचे काम ठप्प

निधी वर्ग होत नसल्याने शाळेचे काम ठप्प

पंचाळे । वार्ताहर Panchale

नाशिक जिल्हा (nashik district) परिषदेच्या कार्यालयाकडे इमारत बांधकामासाठी (Building construction) असलेला 13 लाख रुपयांचा निधी (fund) एम्पथी फाउंडेशनच्या (Empathy Foundation) खात्यावर वर्ग होत नसल्याने दहिवडी येथील प्राथमिक शाळेच्या (Elementary school) इमारतींच्या खोल्यांचे बांधकाम रखडले आहे.

जिल्हा परिषदेने (zilha parishad) त्वरित त्यांच्याकडे देय असलेला निधी फाउंंडेशनच्या (Funding Foundation) खात्यावर वर्ग करून इमारत पूर्ण करावी अशी मागणी दहिवाडीचे सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ गाडे यांनी केली आहे. नाशिक-नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील दहिवाडी येथील जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीच्या वर्ग खोल्या 2014 मध्ये ग्रामपंचायतीने निर्लेखित केल्या होत्या.

तत्कालीन मुख्याध्यापक बबन गोसावी यांनी शाळेसाठी फाउंडेशनकडे वर्गखोल्या बांधण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. एम्पथी फाउंडेशनने या शाळेचा प्रस्ताव मान्य करून निधी मंजूर (Funding approved) केला. शाळेने जिल्हा परिषदेकडे पाठवलेल्या प्रस्तावानुसार साडे बावीस लाख रुपये मंजूर झाले.

तसेच लोकवर्गणी जमा करून पन्नास टक्के रक्कम एम्पथी फाउंडेशनच्या खात्यावर वर्ग केल्यानंतर सदर इमारतीचे काम सुरू झाले. जिल्हा परिषदेने आठ लाख 56 हजारांची रक्कम फाउंडेशनच्या खात्यावर जमा केली. तसेच शाळेने चाळीस हजार रुपये लोकवर्गणी ही संस्थेच्या खात्यावर जमा केली. सध्या शाळेच्या इमारतीचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.

मात्र, जिल्हा परिषदेकडून उर्वरित 13 लाख 26 हजार चारशे रुपये जमा होत नसल्याने संस्थेने इमारतीचे काम थांबवले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दहीवाडी शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असून मुलांना बसण्यासाठी व अध्यापन करण्यासाठी गैरसोय होत आहे. जुनी इमारत जमीन दोस्त करून तीन वर्ष झाले व नवीन इमारतीचे काम तात्काळ होईल

ह्या अपेक्षेवर शिक्षक (teacher) अनेक अडचणींना सामोरे जात विद्यार्थ्यांना (students) त्यांच्या पद्धतीने शिक्षण देण्याचे काम करत आहेत. मध्यंतरी कोरोनाच्या (corona) पार्श्वभूमीवर इमारतीचे काम रखडले होते. आता संस्थेने जिल्हा परिषदेकडे असलेली 13 लाखांची रक्कम वर्ग करण्याचे बंधन घातले आहे. त्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्याचे जिल्हा परिषदेला सोयरसुतक नसल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

जिल्हा परिषदेची 13 लाख 26 हजार 400 रुपये रक्कम जोपर्यंत फाउंडेशनच्या खात्यावर जमा होत नाही तोपर्यंत काम सुरु होणार नाही असे फांऊडेशनने कळविले आहे . याबाबत विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे व जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्याशी चर्चा केली. मात्र, याबाबत कुठलीही कार्यवाही झाली नाही. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने तात्काळ निधी वर्ग करून दिलासा देण्याची गरज आहे.

रामभाऊ गाडे, दहिवाडी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com