ओझे l Oze (वार्ताहर)

दिंडोरी तालुक्यात ४ जानेवारी पासून नववी ते बारावी पर्यतचे वर्ग चालू करण्याची परवानगी शिक्षण विभागाने दिल्यानंतर तालुक्यात सर्व शाळा व महाविद्यालय सुरु करण्यात आले असून शाळेच्या प्रवेशद्वारावरच विद्यार्थ्याचे टेंपरेचर तपासणी करूनच शाळेत प्रवेश दिला जात असून शाळेय व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांची योग्य काळजी घेतली जात आहे.

मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थीसाठी महाराष्ट्र शासनाची मानवविकास कार्यक्रमा अंतर्गत असलेली एस.टी. बस सेवा बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीना शाळेत जाण्याची इच्छा असूनही शाळेला दाडीच मारावी लागत.

चार जानेवारी पासूनच विद्यार्थीनी शाळेत येण्यास सुरुवात केली असून गेल्या १० महिन्यापासून बंद असलेली शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. शिक्षकासह विद्यार्थीना मास्क शिवाय घातल्या शिवाय शाळेत प्रवेश नाकारण्यात आला आहे. त्यामुळे सर्वजन मास्क वापरताना दिसत येत आहे.

तालुक्यातील सर्व शाळामध्ये सेनिटायझरची फवारणी करण्यात येवून योग्य ती काळजी घेण्यात येत. शासनाच्या नियोजन नुसार एका बाकावर एक विद्यार्थी आशी आसन व्यवस्था करण्यात आली असून एक दिवस आड विद्यार्थीना शाळेत बोलविण्यात येत आहे. कारण वर्गातील विद्यार्थी संख्या जास्त असल्यांमुळे दिवसाआड विद्यार्थीना शाळेत बोलविण्यात येत आहे.

दिंडोरी हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी शाळा महाविद्यालयात तालुक्याच्या ठिकाण येत असतात पंरतु लॉकडाऊन पासून गामीण भागातील बस सेवा बंद करण्यात आली आहे. मात्र सध्या शाळा चालू होऊनही महामडळाची बस सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा सुरु होऊनही घरी राहवे लागत आहे.

ग्रामीण भागातील अनेक पालक आपल्या पाल्याला सोयीनुसार शाळेत सोडत आहे मात्र ज्या पालका जवळा साधी मोटरसायकल सुद्धा नाही आशा विद्यार्थीना शाळेत जाण्यासाठी अडचणी येत आहे.

त्याप्रमाणे दिंडोरी येथील जनता विद्यालया समोर विद्यार्थ्यांसाठी बस थांबा ठेवण्यात यावा आशी मागणी विद्यार्थी व शिक्षक वर्गाकडून होत आहे.