गटशिक्षणधिकार्‍यांच्या कार्यालयात शाळा ?

गटशिक्षणधिकार्‍यांच्या कार्यालयात शाळा ?

हतगड । वार्ताहर | Hatgad

सुरगाणा तालुक्यातील (surgana) ग्रामपंचायत रोंघाणे पैकी सांबरखल येथील जि. प. शाळेचे (z.p. school) अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. संबंधित शिक्षण विभागाला (education department) पत्रव्यवहार करून देखील कोणतेही दखल घेतली न गेल्याने या शाळेतील वर्ग (School class) गटशिक्षणधिकारी (Group Education Officer) यांच्या कार्यालयात भरविण्याचा इशारा ‘श्रमजीवी’ संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.

ग्रामपंचायत रोंघाणे पैकी सांबरखल गावातील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांच्या (students) पालकांच्या वतीने गटशिक्षणधिकारी यांना निवेदन (memorandum) देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, अवकाळी पावसामुळे (Untimely rain) जि. प. शाळेच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी या घटनेनंतर पत्रव्यवहार करून नवीन इमारतीची मागणी केली होती. मात्र गेली 1 वर्षे पूर्ण होऊन ही यावर कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांना बाहेर मंदिरात व कुठंतरी घरात बसून शिक्षण (education) घ्यावं लागत आहे.

विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी जागा नाही व इमारत नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे दि. 13 एप्रिल पासून गटशिक्षणधिकारी यांच्या कार्यालयात विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येणार आहे असा इशारा देवून आपल्या कार्यालयात शिक्षण घेण्यासाठी जागा मिळावी, जोपर्यंत इमारत बांधकाम सुरू होणार नाही. तोपर्यंत विद्यार्थी आपल्या कार्यालयात शिक्षण घेतील असा इशारा तालुकाध्यक्ष राजू राऊत, सचिव दिनेश मिसाळ यांच्यासह सांबरखल गावातील पालकांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com