
सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar
तालुक्यातील दापूर (Dapur) येथील गोनाई मळा परिसरात (Gonai Mala Area) बिबट्याच्या हल्ल्यात (leopard Attack) आठ वर्षीय शाळकरी मुलगी जखमी (Injured) झाल्याची घटना आज (दि. ६) सकाळच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, संस्कृती किरण आव्हाड असे जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. सकाळी संस्कृती शेतात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला (Attack) चढवला. या हल्ल्यात संस्कृतीच्या मानेला व तोंडावर बिबट्याच्या पंजाची नखे खोलवर गेल्याने ती गंभीर जखमी झाली.
बिबट्याने हल्ला करताच संस्कृतीने आरडाओरड केल्याने कुटुंबियांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला. यानंतर जखमी झालेल्या संस्कृतीला कुटुंबियांनी (Family Members) तात्काळ उपचारासाठी नाशिक (Nashik) येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना (Forest Department Officials) सदर घटनेची माहिती कळविली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी पिंजरा (Cage) लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार बघायला मिळत असून अनेक पाळीव प्राण्यांनाही बिबट्याने भक्ष केले आहे. अशातच आता एका शाळकरी मुलीवर (School Girl) बिबट्याकडून हल्ला झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.