पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऑगस्टला

पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऑगस्टला

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली इयत्ता पाचवी (5th Standard) आठवीच्या (8th Standard) शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship Examination) ऑगस्टमध्ये घेतल्या जाणार आहेत.

येत्या ८ ऑगस्ट रोजी ही परीक्षा घेण्यास शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी मान्यता दिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेला यंदा जिल्हाभरातून ३२ हजार ९४० विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. पाचवीच्या विद्यार्थ्यांची संख्या १९ हजार १२४ तर आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या १३ हजार ८१६ इतकी आहे.

जिल्ह्याभरात ३११ इतकी परीक्षा केंद्र आहेत. त्यात पाचवीसाठी १७३ आणि आठवीसाठी १३८ केंद्र आहेत. राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) दरवर्षी फेब्रुवारीत घेण्यात येते.

करोनाच्या (Corona) संकटामुळे ही परीक्षा २५ एप्रिलला घेतली जाणार होती. परंतु ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. अखेर करोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर आता ही परीक्षा ऑगस्टमध्ये घेतली जाणार आहेत.

राज्यातील शासनमान्य शासकीय अनुदानित, विनाअनुदानित कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येते.

मागील वर्षी नाशिक जिल्ह्यातील ५७ हजार ६२६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ५४ हजार ८१६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com