महागृहनिर्माण योजनेसाठी 'एसबीआय'कडून 'इतक्या' कोटींचा पतपुरवठा

महागृहनिर्माण योजनेसाठी 'एसबीआय'कडून 'इतक्या' कोटींचा पतपुरवठा

नाशिक । Nashik

सिडकोच्या (CIDCO) प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (Pradhan Mantri Aawas Yojana) साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेसाठी (maha housing yojana) स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (SBI) ५ हजार कोटींचा पतपुरवठा (Credit) मंजूर करण्यात आला आहे.यामुळे सदर महागृहनिर्माण योजनेंतर्गत सुरू असणार्‍या घरांच्या बांधकामास गती मिळून सर्वसामान्यांचे परवडणार्‍या दरातील हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे...

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मंजूर करण्यात आलेल्या पतपुरवठ्यामुळे महागृहनिर्माण योजनेचे काम नियोजित वेळेत पूर्ण करणे शक्य होणार आहे. या महागृहनिर्माण योजनेस ६ टक्के व्याज दराने पतपुरवठा मंजूर करण्यात आला असून एखाद्या सार्वजनिक उपक्रम संस्थेस इतक्या कमी व्याज दराने पतपुरवठा मिळणे ही अतिशय दुर्मिळ बाब आहे. सदर महागृहनिर्माण योजना आपल्या देशातील व जगातील सर्वात मोठी गृहनिर्माण (Housing) योजना ठरेल यात शंका नसल्याचे सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक,डॉ. संजय मुखर्जी (Dr. Sanjay Mukherjee) यांनी म्हटले आहे.

सिडकोसारख्या सार्वजनिक उपक्रम असलेल्या महामंडळास (corporation) स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे केवळ ६ टक्के व्याज दराने पतपुरवठा मंजूर करण्यात आला आहे. एखाद्या सार्वजनिक उपक्रम संस्थेस इतक्या कमी व्याज दराने पतपुरवठा मिळणे ही अतिशय दुर्मिळ बाब आहे. भरीव पतपुरवठा मंजूर करून स्टेट बँक ऑफ इंडियानेही या प्रकल्पाच्या विश्वासार्हतेवर आणि व्यवहार्यतेवर मान्यतेची मोहोर उमटवली आहे. याचा निश्चितच सदर प्रकल्पास वेग देण्यास सकारात्मकदृष्ट्या उपयोग होणार आहे.

तसेच महागृहनिर्माण योजना प्रकल्पाकरिता ३० हजार कोटींचा खर्च अंदाजित असून त्यापैकी ४ हजार कोटींचा खर्च हा सिडकोकडून तर ५ हजार कोटी बँकेच्या पतपुरवठ्याद्वारे आणि उर्वरित खर्च हा प्रकल्पातील अंतर्गत उत्पन्न स्त्रोतांद्वारे करण्यात येणार आहे. तसेच सिडकोने या योजनेच्या मार्केटिंग आणि ग्राहक संबंध व्यवस्थापनासाठी (marketing and customer relationship management) एका खाजगी एजन्सीची नियुक्ती केली आहे, जेणेकरून संपूर्ण विक्री प्रक्रियेदरम्यान आणि विक्री पश्चात सेवा सुलभतेने प्रदान करण्यात येतील. महागृहनिर्माण योजनेसाठी अशा प्रकारचे पाऊल उचलणारे सिडको हे पहिले सरकारी प्राधिकरण ठरले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com