राज्य अजिंक्यपद स्पर्धा : सायलीला सुवर्ण तर तनिशा आणि कुशलला रौप्य

राज्य अजिंक्यपद स्पर्धा : सायलीला सुवर्ण तर तनिशा आणि कुशलला रौप्य

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

धुळे (Dhule) येथे चालू असलेल्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत (State Table Tennis Championship) १७ वर्षाखालील मुलींच्या गटात सायली वाणी (Sayali Vani) हिने नाशिकच्या तनिशा कोटेचा (Tanisha Kotecha) हीचा अत्यंत अटीतटीच्या लढतीत ४-३ असा पराभव करून राज्य अजिंक्यपद मिळवून सुवर्णपदकावर (Gold Medal) आपले नाव कोरले तर तनिशाला रजत पदक (Silver medal) मिळाले…

सायली ही नाशिकची पहिली राज्य विजेती खेळाडू आहे. तसेच १७ वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत अटीतटीच्या लढतीत कुशल चोपडाला मुंबईच्या जश मोदीकडून ३-४ असे पराभवाला सामोरे जावे लागले आणि त्याला रजत पदक मिळाले.

१३ वर्षाखालील मुलींच्या गटात मिताली पुरकर (Mitali Purkar) हीने कांस्य पदक (Bronze medal) पटकावले. जय मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व खेळाडू सराव करतात.

त्यांच्या विजयाबद्दल नासिक जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, अभिषेक छाजेड, मिलिंद कचोळे, संजय वसंत, सतीश पटेल, सुहास आगरकर, राकेश पाटील, राज्य संघटनेचे पदाधिकारी यतिन टिपणीस, संजय कडू, योगेश देसाई, समीर भाटे, भैय्या गरुड, श्रीकांत अंतुरकर, प्रकाश जसानी आदींनी अभिनंदन केले.

अंतिम फेरी निकाल

१७ वर्षाखालील मुली

सायली वाणी विरुद्ध तनिशा कोटेचा

८-११, ११-७, १०-१२, ११-६, ११-९, १०-१२, व ११-९

१७ वर्षा खालील मुले

जश मोदी विरुद्ध कुशल चोपडा

९-११, ११-४, ११-५, ११-९, ८-११, ६-११ व ११-८

Related Stories

No stories found.