'विधवा नव्हे एकल महिला म्हणा' : प्रेरणा बलकवडे

'विधवा नव्हे एकल महिला म्हणा' : प्रेरणा बलकवडे

देवळाली कॅम्प। Deolali Camp

विधवा प्रथा (Widow practice) बंद करु…माय माऊलीचा सन्मान करु! हे अहवान करत आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा (NCP Womens District President) प्रेरणा बलकवडे (Prerana Balkawde) यांच्या संकल्पनेतुन भगूर (Bhagur) शहरात विधवा महिलांसोबत वटपौर्णिमा (vat purnima) साजरी करण्यात आली.

विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी राज्य सरकारने (State Government) पुरोगामी पाऊल उचलले आहे. याला प्रतिसाद देत वटपौर्णिमेच्या दिवशी भगूर शहरात विधवा महिलांचा हळद-कुंकू लावून,साडी चोळीने सन्मान करुन त्यांच्या हस्ते वट वृक्षाचे रोपण करुन नाशिक जिल्ह्यातून विधवा प्रथा बंद करण्याचे आवाहन भगूर येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी केले.

यावेळी बोलतांना बलकवडे म्हणाल्या की, रूढी परंपरेनुसार नवरा (Husband) गेल्यावर कुंकू पुसणे,बांगड्या फोडणे,मंगळसूत्र काढणे, सर्व शुभकार्यातून लांब ठेवणे या गोष्टी केल्या जातात.फक्त एक व्यक्ती गेली म्हणून स्त्रीला असे समाजात बाजूला पाडणे ' विधवा ' हा स्टॅम्प मारणे हे सार्वजनिकरीत्या चुकीचे आहे. विधवा महिलांना इतर महिलांप्रमाने सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. “विधवा” हा शब्दच अपमानास्पद वाटणारा व बंधनांनी घेरलेला असून तो बदलून “एकल महिला” असे आजपासून म्हणू असे बलकवडे यांनी सांगितले. तर यापुढे नाशिक जिल्ह्यात (Nashik district) गावो गावी जाऊन विधवा प्रथा बंद करण्याचे कार्यक्रम राबवणार असल्याचे देखील त्यांनी घोषित केले .

तसेच भगूर शहरात (Bhagur city) ज्या एकल महिलांना कुटुंबात आधार नाही व मुले लहान आहेत त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी झेप फाऊंडेशनच्या (Zep Foundation) वतिने शिलाईमशीनचे वाटप करुन मोफत फॅशन डिजाईनचे प्रशिक्षण येत्या महिन्यात देण्यात येणार आहे. यावेळी जिजाबाई जाधव,आर्चना पारचा, प्रियंका शेलार,सुलोचना मोरे,अनिता गोडसे, मंदाबाई गायकवाड, संगिता कोळेकर, सिंधुबाई इंगळे यांच्यासह २०० हून अधिक महिलांचा सन्मान करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com