
सिन्नर । वार्ताहर | Sinnar
फोनवर बोलताना प्रत्येकाने हॅलो (hello) ऐवजी ‘जय शिवराय’ म्हणा असे मत सकल हिंदू मराठा (Hindu Marathas) अठरापगड समाजाच्या बैठकीदरम्यान पदाधिकार्यांनी मांडले. नुकतीच शासकीय विश्रमागृहावर विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी पदाधिकार्यांच्या बैठकीचे आयोजन (Organizing the meeting) करण्यात आले होते.
अनेक संघटना हिंदू मोर्चा काढता पण काही लोकांना छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची घोषणा द्यायला लाज वाटते. महाराजांचा अवमान होतोय तरी हिंदू-मराठा अठरापगड समाज (Hindu-Maratha Atharapgarh Society) गप्प का? असा सवाल यावेळी पदाधिकार्यांनी उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराज या नावास डावलत असेल तर ती शक्ती ठेचली जाईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाशिवाय एकही मोर्चा तालुक्यात व जिल्ह्यात होऊ न देण्यावर पदाधिकार्यांचे एकमत झाले.
महापुरुषांचा अवमान करणार्या राज्यपालांचा (Governor) यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शरद शिंदे, गोपाळ गायकर, उत्तम लोंढे, शिवाजी गुंजाळ, संदिप लोंढे, सुरेश सानप, सुनील महाराज, संजय कदम, हिरामण जाधव, गणेश जाधव, राम शिंदे, निलेश दादा, अमित शिंदे, दिनकर वाजे, रतन जाधव, देवेश हांडे, विकी पवार उपस्थित होते.