सुरगाणा बाजार समिती सभापतीपदी पवार, उपसभापतीपदी चौधरी यांची निवड
सुरगाणा |प्रतिनिधी | Surgana
सुरगाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Surgana APMC) सभापतीपदी सावळीराम पवार तर उपसभापतीपदी सुभाष चौधरी यांची बिनविरोध (Unopposed) निवड झाली. काल (दि.२३) दुपारी एक वाजता सुरगाणा येथे नवनिर्वाचित संचालकाची बैठक पार पडली. या बैठकीत वरील दोघांची निवड झाली...
यावेळी सभापतीपदासाठी सावळीराम पवार (Sawaliram Pawar) यांचे नाव भिका राठोड यांनी सुचवले. त्यास भास्कर जाधव यांनी अनुमोदन दिले. तर उपसभापतीपदासाठी सुभाष चौधरी (Subhash Chaudhary) यांचे नाव उत्तम कडू यांनी सुचवले. त्यास भरत पवार यांनी अनुमोदन दिले.
दरम्यान, यावेळी संचालक मोहन गांगुर्डे, तुळशीराम भोये, अशोक भोये, अबुकर महम्मद, (राजु बाबा) अब्बास शेख, संजाबाई खंबाईत, पार्वती गावित, पुंडलिक भोये, मोहन राऊत, गौतमचंद पगारिया उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कळवणचे सहायक निबंधक सहकारी संस्थेचे कांतीलाल गायकवाड यांनी काम पाहिले. त्यांना सुजित गायकवाड व सचिव जगदीश आहेर यांनी सहकार्य केले.