२२ ऑगस्टला पीएचडी प्रवेश परीक्षा

२२ ऑगस्टला पीएचडी प्रवेश परीक्षा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) पीएच. डी. प्रवेश परीक्षा (Ph. D. Entrance exam) २२ ऑगस्ट रोजी होणार आहे...

त्यासाठी १२ जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. ३१जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज (Apply online) करता येईल. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार (Dr. Praful Pawar) यांनी केले आहे.

दोन टप्प्यात ही प्रवेश परिक्षा होणार आहे. पहिल्या टप्प्यात १०० गुणांचे बहुपर्यायी प्रश्‍न असतील. त्यात प्रत्येकी ५० गुणांचे दोन पेपर असतील.

दुसऱ्या टप्प्यात पात्र उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेण्यात येईल. त्यानुसार २४ ऑगस्ट रोजी निकाल (Result) जाहीर करण्यात येणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com