पुरात वाहून जाणाऱ्या तरुणांचे वाचवले प्राण

पुरात वाहून जाणाऱ्या तरुणांचे वाचवले प्राण

सिन्नर । वार्ताहर Sinnar

तालुक्यातील कणकोरी-मानोरी ( Kankori- Manori Road ) रस्त्यावर जाम व लेंडी नदीच्या संगमावर पुरात वाहून जाताना दोघे दुचाकीस्वार बालंबाल बचावले. दोन तरुणांनी पाण्यात उड्या घेत वाहून जाणार्‍यांचे प्राण वाचवले आहे.

गोविंद भिकाजी अहिरे व संजय आंधळे हे दोघे सकाळी कणकोरी-मानोरी रस्त्याने दुचाकीवरून जात होते. काल सकाळी साडेसहाच्या सुमारास परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने नदीला पूर आला होता.

काही वाहने पाणी ओसरण्याच्या प्रतिक्षेत रस्त्याच्या कडेला उभी होती. मात्र, एका दुचाकीस्वाराने पुराच्या पाण्यातून दुचाकी घातली. तो सुखरुप पुढे गेला. त्याच्या पाठोपाठ अहिरे व आंधळे यांनीही दुचाकी टाकली.

मात्र, पाण्याच्या प्रवाहात दुचाकीसह दोघे पुलावरुन लोटले गेले. नदीपात्राच्या कडेला पूर पाहत उभे असलेल्या चंद्रकांत सांगळे व निलेश बर्डे यांनी क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उड्या फेकल्या व दोघांना मोठ्या हिंमतीने वाचवले. त्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com